पुणे, दि. २५( punetoday9news):- पुणे शहरात तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण केल्याची येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती . याप्रकरणी पोलिसांनी मयत मुलीच्या आईकडे केलेल्या सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे . या प्रकरणात आईनेच मुलीचा गळा मुलीचा गळा दाबून खून केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.
13 वर्षाच्या मुलाच्या मदतीने खून करून मृतदेह पोत्यात भरुन बंडगार्डन पुलावरुन नदीत फेकल्याची माहिती आईकडे केलेल्या चौकशीतून समोर आली. तसेच ही मुलगी अनैतिक संबंधातून जन्मल्याचे समोर आले . याप्रकरणी येरवडा पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे तर 13 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.
दोघांच्या पोलिसांनी महिलेकडे आणि मुलाकडे चौकशी केली असता बोलण्यामध्ये तफावत आढळून आली . त्यामुळे पोलिसांचा महिलेवर संशय बळावला . पोलिसांनी सखोल चौकशी केली असता मुलगी सतत रडत होती . रात्र रात्र जागवत होती . अनैतिक संबंधातून तिचा जन्म झाला होता . मुलीबाबत नातेवाईकांना काय सांगायचे म्हणून आपणच तिचे तोंड दाबून खून केला . मुलाच्या मदतीने मृतदेह नदीत फेकल्याची माहिती महिलेने दिली . पोलिसांनी नदीपात्रात शोध घेतला असता मृतदेह आढळून आला . या गुन्ह्यात आईला अटक केली आहे तर मुलाला ताब्यात घेतले असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांनी दिली .
ही कारवाई पोलीस उपायुक्त रोहिदास पवार , सहायक आयुक्त किशोर जाधव , वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख, पोलीस निरीक्षक विजयसिहं चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर , उपनिरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे, किरण लिट्टे , पोलीस अंमलदार तेजस भोसले , सिद्धाराम पाटील , अमजद शेख , शुभांगी चव्हाण , विष्णू ठाकरे , अनिल शिंदे यांनी हा तपास केला .
Comments are closed