सांगवी,ता.२५ ( punetodaynews):- शिवभोजन थाळी गरीब मजूर , विद्यार्थी यांच्यासाठी मोठा आधार बनली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी परिसरात हातावरचे पोट असणाऱ्या कष्टकरी, मजुर वर्गाची मोठी संख्या आहे. मराठवाडा,कर्नाटक आदी भागांतून पिंपरी-चिंचवड शहराकडे मजूरी काम व इतर छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायासाठी येणारा मोठा वर्ग आहे. गतवर्षापासून कोरोना व लॉकडाऊनमुळे कामाची घडी विस्कळीत झाल्याने गड्या आपुला गाव बरा म्हणत अनेकांनी गाव गाठले ती सर्व मंडळी आता पुन्हा शहरात आल्याचे चित्र आहे.
मात्र पुर्वीसारखी अजुनही कामे मिळत नसल्याने या कष्टक-यांना दहा रुपयांत जेवण हे शिवभोजन थाळी केंद्राचा आधार ठरत आहेत. तर पुणे व परिसरात शिक्षणासाठी गावाकडून आलेल्या विद्यार्थ्यांनाही शिवभोजन थाळी दिलासा देत आहे.जुनी सांगवी परिसरात सध्या दोन शिवभोजन केंद्रीय असून दोन्ही केंद्रावरून जवळपास दोनशेच्या वर नियमित थाळ्या जात असल्याचे येथील केंद्र चालकांकडून सांगण्यात आले आहे.
अभिनव नगर,जयमालानगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर,मुळानदी किनारा झोपडपट्टी भागातील कष्टक-यांना या शिवभोजन केंद्राचा दिलासा मिळत आहे.दहा रुपयात जेवण ही संकल्पना कष्टक-यांसोबतच विद्यार्थ्यांनाही परवडत असल्याने बहुतांश विद्यार्थीही शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहेत.आधार देणारी ठरत असल्याचे नागरिकांमधून बोलले जाते.
केंद्रात जेवणाचा दर्जा चांगला असल्याने आम्ही जेवणासाठी येतो आर्थिक दृष्ट्या देखील दहा रुपयात जेवण परवडते कमी कॅलरीज जेवण आहे विद्यार्थ्यांना फायदा होतो. शिवभोजनमुळे फायदा होत आहे.
-सागर धुमाळ, सचिन नाईकवाडे ( विद्यार्थी- सांगवी)मी नियमित शिवभोजन थाळी घेतो.चपाती, भाजी,वरण भात चांगले मिळते.
– भास्कर भोसले.(कामगार)
कोरोना काळात माझाही धंदा बंद झाला होता.सामाजिक भावना व त्यातूनच महाराष्ट्र शासनाच्या शिवभोजन केंद्र चालवण्याची मंजुरी मिळवली. सध्या गरजू भागातच शिवभोजन केंद्र चालू झाल्यामुळे गरजवंतांना फायदा होत आहे. सण, उत्सवाच्या दिवशी स्वखर्चाने जेवणात गोड पदार्थांचा समावेश करत आहे.याच बरोबर येथेच बसून जेवणाची सोय करण्यात आहे.
ओंकार भागवत.( केंद्रचालक.)
Comments are closed