नगर,दि. २६( punetoday9news):- अमेरिकेतील विमा कंपनीमार्फत उतरवलेला , तब्बल ३८ कोटी रुपयांचा ( पाच मिलियन अमेरिकन डॉलर ) आयुर्विमा हडप करण्याचा प्रयत्न राजूर ( ता . अकोले ) पोलिसांनी उधळला . विमा रक्कम मिळवण्यासाठी कट रचून एका मनोरुग्णाचा सर्पदंशाने खून करण्यात आला .
या वेळी संबंधित व्यक्ती सर्पदंशाने मृत्युमुखी पडली , असा बनाव करण्यात आला होता . यासंदर्भात ‘ मृत ‘ भासवलेल्या व्यक्तीसह पाच जणांना अटक करण्यात आली .
या गुन्ह्याची माहिती दिली . यामध्ये मुख्य आरोपी प्रभाकर भिकाजी वाघचौरे ( ५४ , रा . राजुर , अकोले ) याच्यासह सर्पमित्र हर्षद रघुनाथ लहामगे ( राजुर ) , प्रभाकरचे दोन सहकारी प्रशांत रामहरी चौधरी ( धामणगाव पाट ) व संदीप तळेकर ( पैठण , अकोले ) व हरीश रामनाथ कुलाळ ( कोंदणी , अकोले ) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे . प्रमुख आरोपी प्रभाकर वाघचौरे याला बडोदा गुजरात येथे अटक करण्यात आली . राजूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नरेंद्र साबळे ,उपनिरीक्षक किरण साळुंके , श्रीरामपूरचा सायबर सेल , अकोले पोलीस यांनी संयुक्तपणे ही कामगिरी केली . या गुन्ह्याची पाश्र्वभूमी अशी , वाघचौरे सन १ ९९ ४ मध्ये अमेरिकेला गेला . वॉशिंग्टन डीसी येथे तो स्वयंपाकी म्हणून काम करत होता . नंतर त्याने कुटुंबाला तिकडेच नेले . त्याची मुले सध्या नोकरी करतात . सन २०१३ मध्ये त्याने पत्नीची १ मिलियन अमेरिकन डॉलर ( सुमारे ७.५ कोटी रुपये ) व स्वत : ची ५ मिलियन अमेरिकन डॉलरची ( सुमारे ३८ कोटी रुपये ) असा एकूण १५ लाख अमेरिकन डॉलरचा आयुर्विमा काढला होता . जानेवारी २०२१ मध्ये
अमेरिकन डॉलरची ( सुमारे ३८ कोटी रुपये ) असा एकूण १५ लाख अमेरिकन डॉलरचा आयुर्विमा काढला होता . जानेवारी २०२१ मध्ये प्रभाकर वाकचौरे एकटाच राजूरला परतला . सुमारे सहा महिन्यापूर्वी २२ एप्रिल २०११ रोजी राजूर पोलीस ठाण्यामध्ये प्रभाकर भिमाजी वाघचौरे याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . अमेरिकेतील विमा कंपनीच्या संशयातून राजूर पोलिसांनी अधिक तपास केला . त्यात या टोळीने नवनाथ यशवंत अनप ( ५० ) या मनोरुग्णाची देखभाल करण्याचा बनाव करत त्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले . हा मनोरुग्ण जवळच्याच गावातील आहे . प्रभाकरने सर्पमित्राकडून कोब्रा जातीचा नाग आणून आठ दिवस बरणीत ठेवला . नंतर एका रात्री मनोरुग्णाला माळरानावर नेऊन त्याच्या पायाला सर्पदंश घडवला . आपण त्याची देखभाल करतो , एकमेव वारसदार असल्याची खोटी कागदपत्रेही प्रभाकरने तयार करुन त्याचा अंत्यविधीही केला होता
प्रभाकर वाघचौरे याने अमेरिकेतील ‘ ऑल स्टेट इन्शुरन्स कंपनी’मार्फत विमा उतरवला होता . प्रभाकरने यापूर्वी पत्नीचा अपघाती मृत्यू झाला असाही बनाव केला होता व तिच्या विमा रकमेची मागणी कंपनीकडे केली होती . या कंपनीसाठी भारतात ‘ डीलिजन्स इंटरनॅशनल ‘ ही कंपनी काम पाहते . या कंपनीसाठी काम करणारे शोधक प्रतिनिधी पंकज गुप्ता यांच्या चौकशीत पत्नीचा मृत्यू झाला नसतानाही विमा रकमेची मागणी केल्याचे आढळले . त्यामुळे प्रभाकरचा दावा कंपनीने फेटाळला होता . प्रभाकरची पत्नी अमेरिकेत जिवंत आहे .
पत्नीच्या मृत्यूचा बनाव करून विमा रक्कम हडपण्याचा प्रयत्न फसल्याने प्रभाकरने स्वत:च्याच मृत्यूचा बनाव केला . मात्र त्यासाठी एका मनोरुग्णाचा खून केला . हा मनोरुग्ण म्हणजेच प्रभाकर असल्याचे भासवले गेले . या कटात त्याने इतर चौघांना सहभागी करून घेतले . आपली ७० लाखांची पॉलिसी आहे , त्यातील ३५ लाख रुपये देण्याचे आमिष त्याने इतर चौघांना दाखवले . स्वत:चा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची कागदपत्रे कंपनीकडे पाठवून त्याने विमा रकमेची मागणी केली .
त्याच्या मागील अनुभवावरून ही चौकशीही पंकज गुप्ता यांनी केली . गुप्ता यांनी पत्नीच्या मृत्यूचा बनाव राजूर पोलिसांच्या निदर्शनास आणला . त्यानंतर तपासाची चक्रे फिरली . पंकज गुप्ता यांनी अशा प्रकारची चार प्रकरणे यापूर्वी उघडकीला आणली आहेत .
Comments are closed