नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे पुणे वनविभागाचे आवाहन.
हडपसर, दि.२६ ( punetoday9news):- पुणे शहरातील हडपसर परिसरात बिबट्याने माणसावरती हल्ला केल्याची घटना घडली आहे .
आज मंगळवार दि. 26 रोजी सकाळी 6 च्या सुमारास गोसावी वस्ती , गावदेवी मंदिर परिसर साडेसतरानळी हडपसर येथे संभाजी बबन आतोडे (वय 45 वर्ष) या इसमावर बिबट्या ने हल्ला केला. घटनेची माहिती वनविभागास कळतास वनविभागाची संपूर्ण टीम तात्काळ घटना स्थळी पोहचली .
सदर हल्ला झालेल्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असून कुठलीही जीवित हानी झालेली नाही . सदर इसमावरती ससून सार्वजनिक रुग्णालय पुणे येथे उपचार सुरु आहे . सदरच्या बिबट वन्यप्राण्यांच्या हालचालीवर पुणे वनविभागाकडून देखरेख सुरु आहे . तरीही नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले आहे .
Comments are closed