जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ.

 

भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४, पुणे कार्यालय

दूरध्वनी क्रमांक – ०२०-२६१३२८०२, २६१२२१३४

संकेतस्थळ – www.acbmaharashtra.gov.in,

ईमेल dyspacbpune@ mahapolice.gov.in,

मोबाईल ॲप www.acbmaharashtra.net.in

किंवा ७८७५३३३३३३ या क्रमांकावर व्हॉट्सऍपद्वारे संपर्क साधून तक्रार नोंदवण्याचे आवाहन.

 

पुणे दि.२६ ( punetoday9news):- भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी २६ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ दिली. या वर्षीचा सप्ताह ‘स्वतंत्र भारत @७५: सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे’ या संकल्पनेसह साजरा करण्यात येत आहे.

यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधिक्षक सुहास नाडगौडा, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक श्रीहरी पाटील आदि उपस्थित होते.

कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याबाबत संबंधित नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. तसेच, भ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असल्याने ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४, पुणे कार्यालय दूरध्वनी क्रमांक – ०२०-२६१३२८०२, २६१२२१३४ संकेतस्थळ – www.acbmaharashtra.gov.in, ईमेल dyspacbpune@ mahapolice.gov.in, मोबाईल ॲप www.acbmaharashtra.net.in किंवा ७८७५३३३३३३ या क्रमांकावर व्हॉट्सऍपद्वारे संपर्क साधून तक्रार नोंदवावी असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!