बसच्या नियमित होणाऱ्या देखभाल, दुरूस्ती वर प्रश्नचिन्ह.
सकाळी १०:३० ते ११ दरम्यान बस ने भर रस्त्यात पेट घेतला.
दापोडी,दि.२७( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव वरुन पुणे मार्केट यार्ड येथे जाणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसने पिंपळे गुरव दापोडी पुलावर अचानक पेट घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते .
सदर घटनेत धुर निघत असल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून चालक व वाहकाने प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला .
सकाळी १०:३० ते ११ दरम्यान ही घटना घडली . पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत बसने पेट घेतला होता . परिसरात रस्त्याचे सुरू असलेले काम व अरूंद पुल यात या घटनेमुळे एक तास रस्त्यावर वाहतूकीची कोंडी झाली होती .
Comments are closed