पुणे, दि.२८( punetoday9news):- अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पिंपरी-चिंचवड येथील हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ प्रकल्पास प्रत्यक्ष भेट देवून येथील कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली.
यावेळी अन्न व औषध प्रशासनचे सहआयुक्त सुरेश पाटील, सहायक आयुक्त कोंडीबा गाडेवार, महामंडळाचे विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब कुऱ्हे, गुणवत्ता विभागाचे नवनाथ गर्जे, उत्पादन विभागाचे मिलींद काळलीकर, अभियांत्रिकी विभागाचे प्रफुल्ल बोरदे आदी उपस्थित होते.


डॉ. शिंगणे यांनी प्रतिविष उत्पादन, गुणवत्ता आश्वासन, उत्पादन, पशुवैद्यकीय विभागास भेट देत महामंडळाच्यावतीने करण्यात येणारे संशोधन, औषध उत्पादन क्षमता, औषधांची मागणी, पुरवठा, गुणवत्ता, साठवणूक आणि चाचणी प्रक्रियेची माहिती घेतली.
यावेळी कुऱ्हे यांनी संस्थेच्या उपलब्ध जागा व मनुष्यबळ बाबत माहिती दिली. सर्पदंष, विंचूदंष, घटसर्प, श्वानदंष, गॅस गॅंगरीन प्रतिविष, प्रतिधनुर्वात लशींचे उत्पादन करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!