मुंबई:-  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘ मेटा ‘ केले आहे . गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक नवीन नावाने रिब्रँड करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येत होत्या . अखेर फेसबुकने कंपनीचं नाव बदललं आहे . पण असं असलं तरी फेसबुकच्या मालकीच्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची नावे कायम राहणार आहेत . कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनीपासून ” मेटाव्हर्स कंपनी ” बनणार आहे आणि “ एम्बेडेड इंटरनेट ” वर काम करेल , जे वास्तविक आणि आभासी जग एकत्र करेल , असं फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे .

2005 ला ही कंपनीने नाव बदललं होतं फेसबुकचे माजी सिविक इंटिग्रिटी चीफ समिध चक्रवर्ती यांनी कंपनीला ‘ मेटा ’ हे नाव सुचवले होते . यापूर्वी फेसबुकने 2005 मध्ये असेच काही केले होते , जेव्हा त्याने आपले नाव TheFacebook वरून Facebook असे बदलले होते . जगभरात 3 अब्जाहून अधिक लोक फेसबुक वापरतात . त्याचवेळी , भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 41 कोटी आहे . फेसबुक आणि इतर मोठ्या कंपन्यांसाठी ‘ मेटाव्हर्स ‘ ही संकल्पना उत्साहवर्धक आहे कारण ती नवीन बाजारपेठा , नवीन प्रकारचे सोशल नेटवर्क्स , नवीन ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि नवीन पेटंटसाठी संधी निर्माण करेल , अशा मार्केटमध्ये आशा आहेत . कंपनीने नाव जाहीर करताना मेटाव्हर्सची नेमकी काय असेल आणि ती प्रत्यक्षात कशी आणली जाईल याची योजना देखील सगळ्यांसमोर मांडली आहे . मेटाव्हर्स हे एक पूर्णतः ऑनलाईन विश्व असेल ज्या ठिकाणी व्हर्च्यूअल वातावरणात आपल्याला ऑनलाईन गेम्स खेळता येऊ शकतील , काम करता येऊ शकेल त्याच बरोबर संभाषण देखील साधता येईल . ऑनलाइन सुरक्षिततेबाबत अनेक देशांमध्ये कंपनीवर प्रश्न उपस्थित होत असताना , प्रक्षोभक मजकूर थांबत नसताना फेसबुकने हे नाव बदलले आहे .

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!