पिंपरी, दि. ३० (punetoday9new):- मराठवाडा जनविकास संघ, आदिवासी समन्वय समिती, आदिम महिला महासंघ यांच्या संयुक्तपणे दिव्यांग प्रतिष्ठान चिंचवड येथील ‘दिव्यांग व्यक्ती, पिंपळे गुरव पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी, पोस्टमन महिला व पुरुष कामगार यांना कपडे आणि मिठाई देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.


कोरोनामुळे श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी अशा कामगारांचा आनंद जणू संपलाच, अशी परिस्थिती आहे. तोच आनंद पुन्हा चेहऱ्यावर फुलवण्यासाठी ‘आनंदाची दिवाळी अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची, नंतर पाहू आपली’, या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी पुराणिक, सहयाद्री आदिवासी मंडळाचे सदस्य विष्णू शेळके, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पिल्लेवार, उद्योजक शंकर तांबे, रोहिणी शेळके, मिनल गभाले, श्रेया वरें, गिरीश गवारी, अंश काची, वैष्णवी वरे, दुर्गा पारधी आदी उपस्थित होते.
गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे संकट आहे. मात्र, गरीब-श्रीमंत, लहान-थोर, कामगार-मालक अशा सर्वांना सुखावून जाणारा व आनंदाची पर्वणी देणारा दिवाळी सण आहे. त्यामुळे या आनंदापासून कुणी वंचित राहू नये, या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग व्यक्ती, पोस्ट ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यांना साडी व पुरुष कर्मचाऱ्यांना पोशाख, तसेच मिठाई देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.
याबाबत अरुण पवार यांनी सांगितले, की आपल्या माणसांसाठी वर्षातील सर्वात मोठा आनंद वाटता येणारा सण दिवाळी आहे. मराठवाडा जनविकास संघ विविध घटकांना सोबत घेऊन नेहमीच दिशादर्शक आणि सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवत आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!