दापोडी ,दि. ३० ( punetoday9news):- जनता शिक्षण संस्थेच्या, सी.के. गोयल महाविद्यालयात मिशन युवा- स्वास्थ्य सप्ताहांतर्गत भव्य लसीकरण मोहीम व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले .
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास मंडळ, आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय, सांगवी, यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व सरस्वती पूजनाने करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय सांगवी येथील आरोग्य विभागाचे डॉ. सचिन लकडे, ज्योती सावंत, तारा रणखांब, स्मिकल तोरणे, दर्शना कुसाटे, सुवर्णा मुठे, भाग्यश्री कोळेकर, वनिता पळेकर, कोमल सोनवणे, कृष्णा कदम, स्विटी अस्वारे, हे आरोग्य कर्मचारी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. शोभा शिंदे, डॉ. निशा मोरे, प्रा.सिद्धार्थ कांबळे, प्रा. सुरेखा हरपुडे, प्रा. अमरदीप गुरमे, प्रा.विनोद डिके, प्रा. ज्योती लेकुळे, श्री. कांताराम खामकर, लक्ष्मण कोहिनकर, हनुमंत गायकवाड, लक्ष्मण मुरकुटे, नंदा काशीद, वंदना दळवी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुभाष सूर्यवंशी, ज्येष्ठ प्रा. सूर्यकांत लिमये, डॉ. सचिन लकडे यांचा सन्मान श्रीफळ, शाल, व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ प्रा. इतिहास विभाग प्रमुख यांच्या सेवापूर्ती निमित्त त्यांचा सन्मान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला.
या लसीकरण व आरोग्य शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी पालक यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन लसीकरण व तपासणी करून घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी केले व आभार -विदुला पुरंदरे यांनी मानले.
Comments are closed