मिशन युवा स्वास्थ्य‘ 

या उच्च  तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचे आयोजन.

 

चिंचवड, दि. ३१( punetoday9news):- चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या  इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट  सायन्स (आयआयएमएस) येथे ‘मिशन युवा स्वास्थ्य’  या  उपक्रमांतर्गत या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीचे कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे तालेरा रुग्णालय  व  उच्च व तंत्रशिक्षण विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम  राबविण्यात आली.

महाविद्यालयीन विद्यार्थी  तसेच परिसरातील इतर महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांना या लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालय कक्षात या लसीकरण  मोहिमेचे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत आयोजन करण्यात आले होते.

कोविड या जागतिक संकटाचा  कायमस्वरूपी नाश करण्यासाठी सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक असल्यानेच  आयआयएमएस तर्फे या लसीकरण  मोहिमेचे आयोजन करण्यात  आल्याचे आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले.

यावेळी तालेरा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जिग्नेश ताटे यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!