पिंपरी,दि.३१( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान,भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच दिवंगत माजी गृहमंत्री,भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे,नगरसदस्या अनुराधा गोरखे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. यावेळी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.
त्यामध्ये आम्ही देशात एकता, अखंडता आणि सुरक्षितता टिकविण्यासाठी स्वतःस समर्पित करू आणि हा संदेश देशवासियांपर्यत पोहोचवू अशी शपथ घेण्यात आली. प्रफुल्ल पुराणिक यांनी राष्ट्रीय एकता दिन शपथेचे वाचन केले.
Comments are closed