पुणे,दि. ३१(punetoday9news):- पुणे शहरातील सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्द येथे राहणाऱ्या 70 वर्षाच्या वृद्ध महिलेचा खून करून घरातील १ लाख ७० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शालिनी बबन सोनावणे ( वय ७० , रा . सायली अपार्टमेंट , केदारीनगरी , हिंगणे खुर्द ) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे . याप्रकरणी त्यांचा मुलगा विराट बबन सोनवणे ( वय ३९ ) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . ही घटना शनिवारी रात्री १० वाजता उघडकीस आली .

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शालिनी सोनवणे या एकट्याच रहात होत्या . त्यांचा मुलगा हा जवळच्या इमारतीत राहतो . काल रात्री तो आईच्या घरी गेल्यावर त्यांना आई हॉलमध्ये पडली असल्याचे दिसून आले . त्यांच्या डोक्याला मार लागला होता . त्यांनी तातडीने पोलीसांना कळविले . घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस घटनास्थळी पोहचले . शालिनी यांच्या डोक्यात कठीण वस्तूने मारुन त्यांचा खून केला असावा असा संशय व्यक्त केला आहे . शालिनी यांचा खून करुन चोरट्याने १ लाख ७० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले आहेत . शालिनी या घरात एकट्याच होत्या . त्यामुळे कोणी तरी ओळखीची व्यक्ती आल्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला असावा , त्याने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्रथमदर्शनी संशय आहे .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!