आयपील के शेर , T 20 विश्वकप स्पर्धेत ढेर.
क्रिकेट :- भारतीय संघाची दुसऱ्या सामन्यातही निराशाजनक सुरूवात झाली असून सर्वच भारतीय सलामी फलंदाज अगदी स्वस्तात तंबूत परतले आहेत. प्रथम फलंदाजी करत भारताकडून भारतीय फलंदाजांनी केवळ ११० धावा केल्या आहेत. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध भारत सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने उत्तम कामगिरी करत भारतीय संघाला केवळ ११० धावात रोखण्याचे काम सहजपणे केले आहे.
दुसरीकडे आज झालेल्या अफगाणिस्तान विरुद्ध नामिबिया सामन्यात अफगाणिस्तान संघाने चमकदार कामगिरी केली आहे.
टी ट्वेंटी विश्वकप स्पर्धेत अफगाणिस्तान संघाची कामगिरी नामिबियाविरुद्धच्या सामन्यातही कायम राहिली . या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यांमधला हा त्यांचा दुसरा विजय आहे . पाकिस्तानविरुद्ध झालेल्या एका पराभवानंतर त्यांनी चांगलं पुनरागमन केलं आहे . अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात स्कॉटलंडवर 130 धावांनी मोठा विजय मिळवला होता . नामिबियावरील विजयानंतर अफगाणिस्तानचा संघ त्यांच्या गटात 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे
Comments are closed