पंढरपूर,( punetoday9news):- देशभरात दिवाळीच्या उत्सवाची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे पंढरपूरमध्ये वेळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे.
या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे . मुख्य आरोपी युवराज प्रकाश गोडसे , रणजीत दत्तात्रेय कोळेकर ( दोन्ही आरोपी वय 23 , रा . उघडेवाडी ) आणि रोहन दत्तात्रय भोसले , ( वय १९ ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , माळशिरस तालुक्यातील उघडेवारी इथे ही घटना घडली आहे . पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह उघडेवाडी गावात राहते . पीडित अल्पवयीन मुलगी सरकारी दवाखान्यात जात होती . त्यावेळी वाटेत तीन नराधमांनी तिला अडवले आणि तिची छेड काढली . त्यानंतर पीडितेला बाजूला असलेल्या एका आडोशाला नेऊन
बळजबरीने लैंगिक अत्याचार केला . पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेली हकीकत आईला सांगितली . त्यानंतर पीडितेच्या आईने वेळापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली . पीडितेचा जबाब नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे . आरोपींना पकडण्यासाठी वेळापूर पोलिसांनी पथक तयार करण्यात आले होते . त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून पळून जाणाऱ्या संशयित आरोपींना इंदापूरमध्ये अटक केली .
या तिन्ही आरोपींना पोलिसांनी आज पंढरपूर न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे .
Comments are closed