पुणे, ( punetoday9news):- वार्षिक 24 टक्के परतावा पुण्यातील नागरिकांना देण्याचे कोट्यावधी आमिष दाखवून अनेक रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . लोकांची फसवणूक करणाऱ्या सोमजी दाम्पत्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या पोलिसांनी दिल्ली विमानतळावरुन ताब्यात घेतले आहे . सोमजी दाम्पत्य हे श्रीलंका मार्गे कॅनडला पळून जाण्याच्या तयारीत होते , अशी माहिती समोर आली आहे .
अलनेश अकील सोमजी , डिंपल अलनेश सोमजी ( दोघे रा . अमर वेस्टव्हिड , लेन नं . 5 , कोरेगाव पार्क , पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपींनी पुण्यातील अनेकांना वार्षिक 24 टक्के परतावा देण्याच्या बहाण्याने गंडा घातला होता . गुन्हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते . शुक्रवारी (दि.29 ऑक्टो.) सोमजी दाम्पत्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती . आज या दोघांना दिल्ली विमानतळावर इमिग्रेशनने ताब्यात घेतले . आरोपींना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतल्यानंतर याची माहिती पुणे पोलिसांना कळवण्यात आली . त्यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दिल्ली येथे रवाना झाले आहे . पथकाने कायदेशीर कारवाई करुन दाम्पत्याला ताब्यात घेतले असून त्यांना पुण्यात आणले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली .
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , सह पोलीस आयुक्त डॉ . रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे , पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे , पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण चव्हाण , अंमलदार सौदाबा भोजराव , अमोल पिलाणे , आशा कोळेकर , हेड कॉन्स्टेबल विजय गुरव , संग्राम शिनगारे , सुरेंद्र जगदाळे , शैलेश सुर्वे , राहुल उत्तरकर यांच्या पथकाने केली.
योगेश विष्णु दिक्षीत ( वय 41 रा . नाना पेठ ) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . आरोपींनी फिर्यादी यांच्यासह इतर दोघांची तब्बल 3 कोटी 37 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक केली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपीनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला एम . जी . एन्टरप्रायजेस या फर्ममध्ये पैसे गुंतवल्यास त्या रकमेवर 24 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले . फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले . फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ठेवून 45 लाख रुपये गुंतवले . ही रक्कम डिंपल सोमजी यांच्या बँक खात्यावर जमा आरोपीवर विश्वास केले .
फिर्यादी यांनी जमा केलेल्या 45 लाखावर 21 लाख 90 हजार असे एकूण 66 लाख 90 हजार रुपये देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले . मात्र , आरोपींनी त्यांना परतावा आणि मुद्दल न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली . याशिवाय आरोपींनी किरण शेट्टी यांची 57 लाख 33 हजार आणि माया चावला यांची 1 कोटी 22 लाख 25 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे .
पैशांची मागणी करुन देखील पैसे मिळत नसल्याने फिर्यादी यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज केला होता . तक्रारीची चौकशी करुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . या गुन्ह्याचा तपास पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण करीत आहेत .
Comments are closed