गोमाता पूजन व दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

पिंपरी,दि.2( punetoday9news):- दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पिंपळे गुरव मधील तानाजीभाऊ जवळकर सोशल फाउंडेशनच्या वतीने श्रीकृष्ण मंदिर येथे वसुबारस निमित्त गोमाता पूजन व दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळीनिमित्त फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येक उपस्थित्यांना मिठाई बॉक्सचे वाटप करण्यात आले.


यावेळी भारतीय योग संस्थान कासारवाडी – पिंपळे गुरव, श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट पिंपळे गुरव, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघ, पितामह भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघ, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ, आनंद ज्येष्ठ नागरिक संघ आदी संघातील ज्येष्ठ नागरिक व पिंपळे गुरव कासारवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते तानाजी ऊर्फ पिंटूभाऊ जवळकर व तृप्तीताई तानाजी जवळकर यांच्यावतीने करण्यात आले होते.
उपस्थित अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

गोमाता पूजनाचे महत्त्व सांगितले. सर्वांनी तानाजी जवळकर यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी अंकुश अप्पा जवळकर, युवा नेते शामभाऊ जगताप, अरुण शेठ पवार, अतुलशेठ काशीद, गणेश जगताप, नितीन काशीद, आशिष सोनवणे, मुकेश पवार सर, रघुनाथ जवळकर, सचिन कुंभार, रामदास पांढरे, रवी बोडके, जितेंद्र जवळकर, दत्तात्रय कदम मामा, नितीन सोनवणे, निलेश जवळकर, किशोर साळुंके, गणेश जवळकर, अतीश जवळकर, निलेश जगधने व तानाजी भाऊ जवळकर मित्र परिवार उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय कदम यांनी, तर भामे सर यांनी आभार मानले.

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!