चिंचवड,दि. ३( punetoday9news):- सरदार गावडे प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी सुरक्षा पथक स्थापन केले.दिवाळीच्या सुट्टीत अनेक नागरिक बाहेरगावी जातात.रात्री परिसरातील घरे सुरक्षित रहावीत म्हणून गस्त करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज करण्यात आले आहेत.


चार दिवस चिंचवड पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली रात्र गस्त घालण्यासाठी सज्ज झाले आहेत या कार्यकर्त्यांना आज चिंचवड पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक राजेंद्र गावडे,शांतता समिती सदस्य पराग कुंकुलोळ,ग्राम रक्षक दल सदस्य सुभाष मालुसरे, धनंजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. पोलिस निरीक्षक पाटील यांनी सर्व सदस्यांना मार्गदर्शन केेले.
रात्र गस्त घालताना काय काळजी घ्यावी व आपल्या परिसरातील नागरिकांची सुरक्षा प्राधान्याने करण्यात यावी तसेच काही अनुचित प्रकार घडत असल्यास पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना माहिती द्यावी अशा सूचना देण्यात आल्या.
या योजनेतून कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्र प्रेमाची भावना जागृत करणे देश सुरक्षित तर आपण सुरक्षित हा विचार घेऊन आपण आपल्या नागरिकांसाठी सामाजिक कार्य करत आहोत अशी भावना राजेंद्र गावडे यांनी व्यक्त केली. या योजनेस चिंचवड पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी शुभेच्छा दिल्या.चिंचवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी सागर आढारी,डी. जी.कांबळे यांनी सहकार्य केले .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!