पिंपरी, दि. १( punetoday9news):- पिंपरी चिंचवडमधील निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फक्त चार हजार रुपयांसाठी   दोन तृतीयपंथीयांनी  एका व्यक्तीचा गळा आवळून खून केला आहे . ही घटना सोमवारी ( दि. 1) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास काळभोरनगर , आकुर्डी येथे प्रीमियर कंपनीच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत उघडकीस आली होती. दोन तृतीयपंथीयांना निगडी पोलिसांनी चोवीस तासाच्या आत अटक केली आहे.

बसराज भिमाप्पा इटकल ( वय 38 , रा . आनंदनगर , चिंचवड ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

लक्ष्मण भिमाप्पा इटकल यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अंजली बाळू जाधव ( वय 25 , रा . गणेशनगर , थेरगाव ) , अनिता शिवाजी माने ( वय 26 , रा . गणेशनगर , थेरगाव ) या आरोपी तृतीयपंथ्यांना पोलीसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास काळभोरनगर , आकुर्डी येथे प्रीमियर कंपनीच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत बेशुद्ध अवस्थेत एक व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले . मयत व्यक्तीच्या गळ्याभोवती गळा आवळल्याचे व्रण होते . हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली . दरम्यान , घटनास्थळी दोन तृतीयपंथी रात्रीच्या वेळी थांबत असल्याचे पोलिसांना समजले . त्यानंतर पोलिसांनी आरोपी अंजली आणि आरोपी अनिता या दोन तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले . सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली . मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी खरे सांगितले . पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली . हा खून फक्त चार हजार रुपयांच्या कारणावरून केला असल्याचे  तृतीयपंथियांनी पोलीस तपासात सांगितले.

सदरची कामगिरी  पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ,अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे,पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त डाँ . सागर कवडे  यांच्या मार्गदर्शनाखाली  वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड  पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) विश्वजीत खुळे ,सहा . पोलीस निरीक्षक ,अमोल कोरडे , विजयकुमार धुमाळ ,  महेद्र आहेर , विजय पवार, पोलीस हवालदार सतिश ढोले , सुधाकर अवताडे , पोलीस नाईक शंकर बांगर , विनोद व्होनमाने , राहुल मिसाळ , विजय बोडके , भुपेंद्र चौधरी , तुषार गेंगजे , विलास केकाण पोलीस शिपाई नितीन सपकाळ यांनी केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!