सिंहगड, दि. ४ ( punetoday9news):- पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात दि . ३० ऑक्टो. रोजी ७० वर्षीय वृद्धेचा खून झाला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली असून त्यांनी सी.आय.डी. मालिका पाहून खूनाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शालीनी बबन सोनवणे (वय ७० वर्षे रा . सायली हाईंटस, हिंगणे खुर्द पुणे) यांचा खून करून चोरट्यांनी घरामधील कपाट उघडे असुन कपाटातील सोन्याचे दागिणे , व रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार झाली होती . सदर घटनास्थळाचे निरीक्षण करता , चोरी करण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरटयाने ७० वर्षीय महिलेचा खून केल्याचे प्रथम दर्शनी दिसुन आले .
तसेच परिसरातील चौकशी दरम्यान आरोपी व त्याचे दोन मिञ पाणीपुरी न खाताच परत गडबडीने घरी आले होते. सदर मुलांबाबत अधिक माहिती घेता , त्यातील एका आरोपीस स्वतःच्याच
घरामध्ये चोरी करण्याची सवय असल्याची माहिती समोर आली . आरोपींचे वय १६ व १४ वर्षे असून त्यांचे मृत वृद्धेच्या घरात नेहमी येणेजाणे होते . व मयत महिलेकडे कायम खुप पैसे असतात व ते पैसे कोठे ठेवतात , याबाबत माहितीही त्यांना होती . सुमारे दोन महिन्यापुर्विच त्यांनी सीआयडी मालिका पाहून चोरी करण्याचा कट रचून मयताचे घराची चावी चोरली होती . तसेच चक्क मृत वृद्धेसोबत टी.वी पाहून त्यांचा खून करून कपाटातील ९ ३,००० / – रुपये रोख रक्कम व ६७,५०० / – रुपये रकमेचे सोन्याचे दागिणे , असा एकुण १,६०,५०० / -रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करुन नेला होता .
आरोपींनी चोरलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिणे त्याचेकडुन हस्तगत करण्यात आले आहे . सदरची कामगिरी श्रीमती पोर्णिमा गायकवाड , पोलीस उप – आयुक्त , परीमंडळ ३. सुनिल पवार , सहा पोलीस आयुक्त , सिंहगड रोड विभाग देविदास घेवारे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सिंहगडरोड पो.स्टे . देवीदास घेवारे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन थोरबोले , पोलीस उप निरीक्षक , कुलदिप संकपाळ , पोलीस अंमलदार , उज्वल मोकाशी , सचिन माळवे , शंकर कुंभार , किशोर शिंदे , अविनाश कोंडे , अमेय रसाळ , सुहास मोरे , इंद्रजित जगताप , अमोल पाटील , सागर भोसले , विकास बादल , विकास पांडोळे , अमित बोडरे , यांनी केली . सदर गुन्हयाचा पुढील तपास मा . पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे हे करीत आहेत
Comments are closed