मुंबई ( punetoday9news):- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ( NCB ) मुंबईत मोठी कारवाई केली . विमानतळ परिसरात करोडो रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे .
गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे . मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाने चर्चेत आलेल्या एनसीबीने विमानतळावर इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनल सहार कार्गो कॉम्प्लेक्स येथून कथित ७०० ग्रॅम व्हाईट पावडर जप्त केली , हे हेरॉईन असल्याची माहिती आहे . ज्याची किंमत ४ कोटी रुपये आहे . याबाबत एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू आहे अशी माहिती एनसीबी ने दिली आहे.
एनसीबीने मंगळवारी ( २ नोव्हेंबर ) देखील विलेपार्के परिसरात मोठी कारवाई केली होती . एनसीबीने करोडो रुपयांचे हेरॉईन जप्त केले . कोट्यवधींचे हेरॉईन जप्त करण्याच्या या कारवाईची माहिती एनसीबीने दिली आहे . या प्रकरणातील संशयितांचा एनसीबी पथक शोध घेत आहे . एनसीबीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी अद्याप तपास सुरू आहे .
NCB Mumbai seized 700 g of off white powder purported to be heroin, valued at Rs 4 cr, at Conference Hall, Int'l Courier Terminal Sahar Cargo Complex, Mumbai from Courier Parcel. Consignee's statement recorded y'day at Vadodara. His interrogation is on at Mumbai office today: NCB
— ANI (@ANI) November 4, 2021
Comments are closed