शिरुर, दि. ६( punetoday9news):- सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ पुणे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने आणि ‘प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरूर यांच्या सहकार्याने कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण शिबीरचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते.
कोविड- १९ साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या परिपत्रकानुसार या कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. बाहेती व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. बाहेती हे होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. बाहेती म्हणाले की, कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असून महाविद्यालयाने या शिबिराचे आयोजन करून या कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. बाहेती म्हणाले, “ कोविड -१९ नियंत्रणात आला असला तरी तो पूर्णत: संपुष्टात आला नाही, यासाठी लसीकरण, योग्य सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी हात धुणे, मास्क वापरणे, निर्जंतुकीकरण करणे, इ. ची सवय लावून घेणे आवश्यक आहे.”
कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरण शिबिरासाठी शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन शिंदे, महेश महामुनी, गणेश हिंगे व शीतल वाजे मॅडम यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे, सचिव धनंजय थिटे, हर्षवर्धन थिटे, समन्वयक शिवाजीराव पडवळ यांनी शुभेच्छा दिल्या. ह्या कार्यक्रमासाठी डी. फार्मसिचे प्राचार्य डॉ. अमोल शहा, प्रा. विशाल कारखीले व शुभांगी खळदकर हे उपस्थित होते. या लसीकरण शिबिरात महाविद्यालयाच्या १६ विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले.
यावेळी प्राचार्यांच्या हस्ते मान्यवरांचा जास्वंदीच्या झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन कोठावदे यांनी केले, तर आभार विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. निशिकांत शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनोज तारे यांनी केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन कोठावदे, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. निशिकांत शिंदे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक रोहित कदम, सिद्धेश गवारी, मोनिका कदम, श्रुती कलदाते व इत्यादी स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.
Comments are closed