आकुर्डी ( punetoday9news):- महापुरूषांचे विचार नाचण्यासाठी नाही तर ते वाचण्यासाठी व आत्मसात करण्यासाठी आहेत,तो वारसा बोधिसत्व सहकारी रुग्णालय मर्यादित पुढे घेऊन जात आहे,कोरोनाच्या संकटाने मानवजातीला वेठीस धरले असताना सुदृढ आरोग्य चळवळ निर्माण करणे काळाची गरज आहे,असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड मनपा उपआयुक्त आण्णा बोदडे यांनी केले.
बोधिसत्व सहकारी रुग्णालय, तक्षशिला बुध्द विहार आकुर्डी,पुणे. यांच्या संयुक्त विद्यमाने निशुःक आरोग्य तपासणी निदान शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी बोलताना ते म्हणाले कोरोनाच्या भयाने देव देवालय सर्व काही बंद होत, अशा वेळी फक्त डॉक्टर आणि त्यांचे सहकारी जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा अविरत पणे देत होते, गोरगरीब रुग्णांना माफक दरात उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी व आरोग्य क्षेत्रातील उणीवा भरुन काढण्यासाठी आपले बोधिसत्व रुग्णालय लवकरच सुरू होणार असल्याचा आनंद होत आहे, या कार्यात सहभागी होऊन आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन बोदडे त्यांनी दिले.
सदर प्रसंगी बोधिसत्व सहकारी रुग्णालयचे मुखप्रवर्तक डॉ.मोरेश्वर सुखदेव म्हणाले कोरोनाच्या या काळात अनेकांना हाल अपेष्ठा भोगाव्या लागल्या, वेळेत योग्य औषध उपचार मिळाले नाहीत म्हणून आपल्या जवळच्या माणसांना मुत्युला समोर जावे लागले हे चित्र अत्यंत वेदनादायी, हतबल करणारे होते,म्हणूच आपले सहकारी रूग्णालये असणे गरजेचे आहे असा विचार मनात आला आणि त्याला सर्व संचालक मंडळाने व तज्ञ डॉक्टर मंडळीनी मान्यता दिल्यामुळेच आपल्या बांधवांच्या शेअर सहभागातुन हे स्वप्न नक्की साकार होईल असे मत त्यांनी व्यक्त केले, यावेळी विचारपीठावर बोधिसत्वचे उपाध्यक्ष,डॉ,पी.टी. गायकवाड, संचालक डॉ, मंगला आचरेकर, राजाभाऊ काळबांडे,अनिलकुमार सुर्यवंशी, प्रा.गौतम मगरे, पोपट वाघमारे, डॉ,उज्वला बेंडे यांच्यासह मान्यवर पाहुणे रविंद्र दुधेककर, शरद जाधव, दीपक म्हस्के, डॉ.किशोर खिलारे, उद्योजक मनोज गजभिये, रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदूस्तान अँन्टिबायोटिक्स,पिंपरी यांच्या विशेष सहकार्याने Hal Cloud clinic या नाविन्यपूर्ण पॅथॉलॉजी टेस्टिंग मशिन द्वारे विविध प्रकारच्या महत्वाच्या पंचवीस टेस्ट रुग्णांच्या विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्याने रुग्णांनी मोठ्या प्रमाणावर त्याचा लाभ घेतला तर तक्षशिला मंडळाच्या वतीने रुग्ण सेवा म्हणून व्हीलचेअर दान करण्यात आली.
विविध क्षेत्रातील तज्ञ डॉ. सुरेंद्र बेंडे(सर्जन) डॉ.संपद केदारे (बालरोग)डॉ.संपद दारुंडे (नेत्र) डॉ.अंजली जाधव(स्री रोग) डॉ.अनिल व शिल्पा बिऱ्हाडे(अस्तिरोग)डॉ,वर्षा जावळे डॉ.सचिन नरवडे डॉ.संघमित्रा खोब्रागडे डॉ.सुजाता कोठाळे डॉ.सुमेध चव्हाण डॉ. नितिन भिसे डॉ.ज्योस्ना वाघमारे डॉ.सायली जाधव डॉ.शुभम उबरहांडे आदी मान्यवर तज्ञ डॉक्टर मंडळीनी या भव्य आरोग्य तपासणी, निदान व औषध उपचार शिबिरात आपले अनमोल योगदान दिले.
सूत्रसंचालन संजय बनसोडे यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अनिल सुर्यवंशी यांनी केले, तर शिबिर यशस्वी होण्यासाठी एस.एल.वानखेडे, संजय उबाळे, गोकुळ चव्हाण, दीपक म्हस्के, वालकर, मुनेश्वर, शिंदे, शहाजी शिंदे, पोपट वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed