सांगवी, दि.७( punetoday9news):- जुनी सांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते विकास कैलास भागवत आणि सार्थक सोशल फाउंडेशन तर्फे दिवाळीच्या सुट्टी निमित्त भव्यदिव्यअसा हुबेहूब शिवनेरी किल्ला साकारण्यात आला आहे.
या किल्ल्याच्या निमित्ताने ऐतिहासिक गोष्टींचा वारसा जपण्याचा तसेच गड किल्ल्यांच्या स्वच्छतेचा, संवर्धनाचा सामाजिक संदेश देणारा सुंदर असा देखावा लहान मुलांनी साकारला आहे.
किल्ला पाहायला आल्यानंतर लहान लहान मुले किल्ल्याबद्दल ची माहिती आणि पोवाडे म्हणून दाखवतात, हा किल्ला पाहण्यासाठी परिसरातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
हा किल्ला बनवण्यासाठी अथर्व रुग्गे, अनुष्का, तन्मय आणि तनिष्क कांबळे ,विशाल लाळगे, सोहम जगताप, श्रावणी सुर्वे, ओम उमेश पाटील, सचिन गर्जे यांनी मदत केली. यावेळी भाऊबीजेच्या निमित्ताने अनाथाश्रमातील मुलांना किल्ला पाहण्यासाठी बोलवून फराळाचे वाटप आणि शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, रा.काँ कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक हर्षल ढोरे, मनसे नेते राजू साळवे, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. अष्टविनायक मित्र मंडळ यांनी सहकार्य केले.
Comments are closed