पुणे, दि. ८( punetoday9news):- पुणे शहरातील लष्कर जलकेंद्र येथील विद्युत / पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे गुरूवार दि. ११ रोजी काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या दुरूस्तीच्या कामामुळे पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे . तसेच शुक्रवार दि. १२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे . तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे अशी विनंती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आली आहे .
पाणी पुरवठा बंद असणारा भाग लष्कर जलकेंद्र भाग : – लष्कर भाग , पुणे स्टेशन परीसर , मुळा रस्ता , कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता , रेसकोर्स परीसर , वानवडी , कोंढवा , हडपसर , महंमदवाडी , काळेपडळ , मुंढवा , खराडी , सोलापूर रस्ता , गोंधळे नगर , सातववाडी इत्यादी . “
Comments are closed