पुणे ( punetoday9news):- पुण्यातील लोहगाव या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीला हॉटेलवर नेऊन तिच्यावर अल्पवयीन मुलाने वारंवार बलात्कार केला असल्याची बाब समोर आली आहे. या मुलीने नकार दिल्यावर आरोपी मुलाने शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी दिली .
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी धानोरीमधील एका १७ वर्षाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . कळस येथील एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . हा प्रकार मे ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान लोहगाव , पोरवाल रोडवरील लॉजवर घडला आहे .
फिर्यादी यांची १५ वर्षांची मुलगी तिला एका १७ वर्षाच्या मुलाने मे महिन्यात लोहगाव येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तिने नकार दिल्यावर तिला शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी दिली . ऑक्टोबर २०२१ मध्ये फिर्यादी यांच्या राहते घरासमोर त्यांच्या मुलीचा हात धरून तिला सोबत चल असे बोलला . तिने नकार दिल्यावर तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली . त्याबाबत आता तक्रार दिल्याने पोलिसांनी पोक्सो खाली गुन्हा दाखल केला आहे . पोलीस उपनिरीक्षक मगदुम तपास करीत आहेत .
Comments are closed