पिंपरी, दि. १५( punetoday9news):- साधू-संतांच्या विहार सेवेत सदैव तत्पर असणाऱ्या पी.सी.एम.सी.विहार सेवा ग्रुपच्या सदस्यांचा सन्मान स्थानकवासी जैन श्रावक संघ, चिंचवड़ गांव यांच्या वतीने करण्यात आला.
जैन साधू,संतांच्या सुरक्षिततेसाठी नियमितपणे कार्य करणाऱ्या.युवकांना युवाचार्य भगवंत प.पु.महेंद्रऋषीजी म.सा.हितमीत भाषीय हितेंद्र ऋषीजी म.सा. व उपप्रर्वतीनी प.पु. सन्मतीजी म.सा.आदी ठाणा यांच्या सानिध्यात गौरविण्यात आले.
चिंचवड गावातील कल्याण प्रतिष्ठाण येथे झालेल्या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष अशोक बागमार,स्वागताध्यक्ष राजेश सांकला,दिलीप नहार,राजेंद्र जैन,नंदकुमार लुणावत,मनोज बाफना यांच्या हस्ते विहार ग्रुप यांना सन्मानचिन्ह देण्यात आले.चातुर्मास समाप्ती नंतर साधू-संत विविध भागात पायी भ्रमण करतात.त्यांच्या या प्रवासात सेवा देण्यासाठी विहार सेवा ग्रुप चे कार्यकर्ते नेहमीच योगदान देतात.याच बरोबर सामाजिक कार्यातही यांचे मोठे सहकार्य असते.त्यांच्या या कार्याची दखल घेत संघाने त्यांचा गौरव केला.
युवाचार्य महेंद्र ऋषींनी या ग्रुप च्या सेवेबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.पुढील काळात या ग्रुप कडून असेच कार्य घडत राहील असा विश्वास व्यक्त केला.विहार सेवेत मिळणार आनंद व सर्वांचे सहकार्य या बाबत भद्रेश शहा यांनी सर्वांचे आभार मानले.संतोष लुंकड,मनीष सोनिगरा,सचिन धोका ,जितेश राठोड, संतोष मुथा,धीरज कोचेरीया, भरत कुवाड, मुकेश शहा यांच्या सह विहार सेवेचे सर्व सभासद याप्रसंगी उपस्थित होते.
Comments are closed