सांगवी, दि. १६ ( punetoday9news):- राष्ट्रीय पत्रकार दिनाचे ( १६ नोव्हेंबर ) औचित्य साधून आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेतून व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी, दापोडी परिसरातील ज्येष्ठ पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमा वेळी ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले, “पत्रकारितेच्या रोजच्या दगदगीच्या जीवना मध्ये कुठे तरी एक मैत्री पूर्ण संवाद यावा. तसेच यानिमित्ताने दुःख सुख जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.”
यावेळी रमेश मोरे, संतोष महामुनी,
मिलिंद संधान, बलभिम भोसले, महादेव मासाळ, संदीप सोनार, ज्ञानेश्वर टकले, संगिता पाचंगे, विजय गायकवाड, प्रकाश जमाले, सागर झगडे यांना सन्मानित करण्यात आले.
Comments are closed