दि.१८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर सरल डाटाबेस द्वारे. 

दि. १० डिसेंबर ते २० डिसेंबर प्रचलित पद्धतीने.

दि. १८ नोव्हेंबर ३० डिसेंबर चलन पद्धतीने फी भरणे.

पुणे,दि.१८( punetoday9news):-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी परीक्षा सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ . १० वी ) परीक्षेस नियमित , पुनर्परीक्षार्थी , नाव नोंदणी प्रमाणपत्र ( Enrollment Certificate ) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी ( Private Candidate ) , तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून , ITI ( औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी ) आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत . सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

अ ) आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर त्यांना शाळा Login मधून Pre – list उपलब्ध करून दिलेली असेल शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रातील नमूद केलेली जनरल रजिस्टरच्या माहितीनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी व त्याबाबत Pre – list वर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी . त्यानंतर सदर Pre – list चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी .

ब ) माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व Pre – list जमा करावयाची तारीख मंगळवार दि . ०४ / ०१ / २०२२ अशी राहील . इ .१० वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भरावी . सर्व माध्यमिक शाळातील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे . १. कोविड १ ९ विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने व विशेषत : आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.

माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी Saral Database मध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे . व सदर Saral Data वरुनच नियामित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाची आहेत .

३ पुनर्परिक्षार्थी , नाव नोंदणी प्रमाणपत्र ( Enrollment Certificate ) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी ( Private Candidate ) , श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन , ITI ( औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी ) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती Saral Data मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने ऑनलाईनच भरावयाची आहेत .

४. कौशल्य सेतु अभियानाचे Transfer of Credit मागणान्या विद्यार्थ्यांनी देखील online पध्दतीने आवेदनपत्र भरुन विषयासमोर Transfer of Credit ची नोंद करावी .

याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलीत पध्दतीने आवेदनपत्र व आवश्यक कागदपत्रे यांची हार्डकॉपी ( Hard Copy ) विभागीय मंडळात जमा करावी .

५. सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी प्रचलित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात .

६. नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाव्दारेच भरण्यात यावे .

७. सर्व माध्यमिक शाळांनी गतवर्षीप्रमाणेच परीक्षा शुल्क संगणकीय चलन Download करुन चलनावरील नमूदप्रमाणे मंडळाच्या 1 मध्ये NEFT / RTGS व्दारे वर्ग करावयाचे आहे . माध्यमिक शाळांनी NEFT / RTGS ब्दारे वर्ग केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातून प्रत्यक्ष वजा झाली आहे किंवा नाही तसेच Account Number व IFSC Code चुकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक यांची राहील .

८. सन २०२२ मधील परीक्षेसाठी नोव्हेंबर – डिसेंबर २०२० सन २०२१ अथवा सप्टेंबर – ऑक्टोबर २०२१ मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेतंर्गत आवेदनपत्र भरुन परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे . त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणत्याही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांस श्रेणीसुधार योनजेतंर्गत परीक्षेस प्रविष्ठ होता येणार नाही .

असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!