पिंपळे गुरव, दि. १९( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरातील महापालिकेच्या शाळेजवळ अनाथ आजी असल्याची माहिती मिळताच संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे यांनी त्यांची विचारपूस करून मदत केली.
अनाथ आजी शशिकला कृष्णा अदमाने (वय ६३) या कुटुंबातील सदस्यांनी घराबाहेर काढले असून कुणीही सांभाळत नसल्याची माहिती देतात. याविषयी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्या पत्यावर कुणीही नसल्याचे आढळले. संबंधित आजीचा अपघातही झाला असल्याने पाय फ्रॅक्चर आहे. त्यामुळे त्यांच्यावर संजय मराठे यांनी हाॅस्पिटलमध्ये भर्ती करून औषोधोपचार केले तसेच लवकरच अनाथ आश्रमात पाठवणार असल्याची माहिती यांनी दिली.
गरजवंत अनाथ आजीला मिळालेल्या या आधार व औषोधोपचाराने त्या सुखावल्या असून मिळत असलेल्या मदतीबद्दल शुभार्षीवाद देत समाधान व्यक्त करत आहेत.
Comments are closed