पिंपरी,२०( punetoday9news):- यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या  इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या  पीएच. डी. संशोधन  केंद्रातर्फे संशोधनपद्धती या विषयावरील  दोन दिवसीय ऑनलाईन  कार्यशाळेचे  आयोजन करण्यात  आले आहे.

कार्यशाळेच्या  उद्घाटनप्रसंगी   सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या  संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यशाळेच्या  पहिल्या दिवशी  प्रथम सत्रात  ‘संशोधन समस्या ओळखणे व तयार  करणे’ या  विषयावर बोलताना  जमनालाल  बजाज इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे  संचालक प्रा. डॉ. चंद्रहास  चव्हाण  यांनी  आपल्या व्याख्यानात   विविध उदाहरणे  देत संशोधन विषयाची निवड कशी करावी, विषय निश्चिती करताना कोणकोणत्या बाबी विचारात घ्यायला हव्यात,निकष  काय असायला हवेत,संबंधित  विषयाची व्याप्ती व आवाका  हा आपल्या अभ्यासविषयाशी सुसंगत आहे  का हे  लक्षात घेणे गरजेचे आहे असे सांगितले. तसेच विषय निश्चिती झाल्यानंतर

त्या संशोधनविषयाशी अनुकूल अशी संशोधन पद्धती वापरणेच सोयीचे ठरते असेही  डॉ. चव्हाण  यांनी सांगितले. संशोधन करताना सामान्यत: संशोधकाला ज्या  समस्यांचा सामना करावा लागतो त्याची ओळख करून देत सुसूत्रीकरणामुळे संशोधनपद्धती  कशी  योग्य होते याविषयीही  त्यांनी चर्चा केली.

तर या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात   वैकुंठ मेहता नॅशनल  इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटच्या माहिती तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. यशवंत पाटील  यांनी  आपल्या  मनोगतात साहित्याची समीक्षा आणि संशोधनाची उद्दिष्टे याविषयी मार्गदर्शन करीत  साहित्य समीक्षेचा क्रम आणि साहित्य समीक्षेतील संदर्भांबाबत तसेच  संदर्भसूची कशाप्रकारे  मांडावी याविषयी सविस्तर  मार्गदर्शन केले. दोनशे हुन  अधिक  जणांनी  या कार्यशाळेत  सहभाग  नोंदवला. तर  प्रास्ताविक  करताना  आयआयएमएस चे संचालक  डॉ. शिवाजी मुंढे यांनी  दोन्ही व्याख्यात्यांचे स्वागत  केले. कार्यशाळेचे  समन्वयक म्हणून डॉ. सचिन मिसाळ यांनी काम पाहिले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत वाडकर यांनी  केले.

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!