पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार वाढला असून बदलत्या हवामानामुळे चिंतेत भर घातली जात आहे. पुण्यातील महापौरांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने पुणे शहराची चिंता वाढली आहे त्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर माई ढोरे यांनी स्वतःची कोरोना तपासणी करून घेतली. त्याचा रिपोर्ट रविवारी (दि. ५) रात्री उशिरा प्राप्त झाला. महापौर ढोरे यांचा रिपोर्ट  निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रथम नागरिक महापौर माई ढोरे या वयाच्या ६० व्या वर्षी सुद्धा जनतेसाठी  अहोरात्र कार्यरत आहेत. विशेषतः वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध रुग्णालयांशी संवाद साधून माहिती घेणे सूचना देणे, शहराच्या विविध भागांतील कोरोनाग्रस्त आणि कंटेन्मेंट भागाची पाहणी करणे, उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेणे, पिंपरी-चिंचवड व पुण्यात विविध मंत्र्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बैठकांमध्ये सहभागी होणे, स्वतः अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे कार्य त्या करत आहेत.

सद्यस्थितीत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दिवंगत दत्ता साने, भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे, शैलेश मोरे यांना कोरोनाची लागण झाल्याने नागरिकांमध्ये कोरोना विषयी थोडे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. महापौर माई ढोरे या पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत पुण्यातील अनेक बैठकांमध्ये सहभाग घेतला होता. दोघांनीही शेजारी बसून अनेक विषयांवर चर्चा केली होती. अशा स्थितीत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खबरदारी म्हणून महापौर माई ढोरे यांनीही स्वतःची कोरोना तपासणी करून घेतली. त्यात महापौर माई ढोरे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच  “पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्व नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी.” असे सांगितले तसेच कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका, तोंडाला मास्क लावा, बोलताना ६ फुटाचे अंतर ठेवा, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करा, प्रशासन आपली काळजी घेतच आहे मात्र नागरिकांनी स्वतः सुद्धा जबाबदारीने वागले पाहिजे , असे आवाहन केले .   

Comments are closed

error: Content is protected !!