पिंपळे गुरव, दि. २२( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव मधील सृष्टी चौक येथे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप व उद्योजक माऊलीशेठ जगताप यांच्या मार्गदर्शना मध्ये बिरसा मुंढा यांच्या जयंती निमित्त सृष्टी चौक येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे जिल्हा यांच्या वतीने आदिवासी गौरव यात्रा काढण्यात आली. यात्रेचे स्वागत माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप व नगरसेविका उषा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आदिवासी महिला व बांधवांनी आदिवासी नृत्य सादर केले.
यावेळी माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप नगरसेविका उषा मुंढे माजी नगरसेविका वैशाली जवळकर, नगरसेवक सागर आंघोळकर, संतोष कांबळे, महेश जगताप, संजय मराठे, अंकुश मुंढे, प्रकाश कांबळे, सुदाम मराडे, कृष्णाजी भालचीन, वामण गोटे, राम लेंभे, अतुल जोशी, डी बी घोडे, बाळशीराम बोकड, निखिल जोशी आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
Comments are closed