खंडाळा,दि२३( punetoday9news):- पुणे येथे कॉलेजचे प्राचार्य मेजर थॉमसकॅंडी यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन, महात्मा फुले यांचा पुणे विश्रामबाग येथे सरदार व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत दि. १६ नोव्हेंबर १८५२ रोजी शालजोडी देऊन सत्कार केला या दिनाच्या १६९ व्या संस्मरणीय दिनाचे औचित्याने अभिवादन व क्रांतिकार्य उजाळा कार्यक्रम संपन्न झाला.


याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संपतराव जाधव अध्यक्ष भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती हे होते, प्रमुख पाहुणे अष्टविनायक ग्लास चे व्यवस्थापक दीपक शिर्के ,गुरुकुल विद्यामंदिरच्या प्रमुख सुप्रिया ननावरे,  रोहिणी रासकर (सामाजिक कार्यकर्त्या),  दत्तात्रय माळी (अध्यक्ष माळी सेवा संघ) मान्यवर होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलन , प्रतिमा पूजन व अभिवादन उपस्थितीत मान्यवरांनी व फुलेप्रेमींनी केले .  गुरुकुल मधील विद्यार्थ्यांनिनी सावित्रीबाईंच्या ओवीचे गायन केले. महात्मा फुले विचार अभियान यशोगाथा व अभियानातील कार्याचा आढावा संयोजक अजित जाधव संचालक सुजन मल्टिपल निधी लिमिटेड यांनी प्रास्ताविक केले.


याप्रसंगी सुजन फौंडेशन यांच्या वतीने सुरेश शिंदे लेखक व साहित्यिक फलटण साहित्य क्षेत्रातील भरीव योगदान बद्दल व जगन्नाथ शेंडगे कुटुंप्रमुख , ब्लू डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूल लोणंद यांना शैक्षणिक योगदानाबद्दल महात्मा फुले पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सीमा एकतपुरे सामाजिक कार्यकर्त्या, अकलूज रोहिणी रासकर सामाजिक कार्यकर्त्या, पिंपरी चिंचवड मनीषा भोपळे
सामाजिक कार्यकर्त्या  भाईंदर,  सुरेखा शिंदे साखर शाळा शिक्षिका ,लेखिका फलटण किरण गोसावी सामाजिक कार्यकर्त्या, पुणे
या महिलांना सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राजेश बोराटे शिक्षक जि प शाळा यांना महात्मा फुले शिक्षक पुरस्कार देण्यात आला. मंगेश रायकर, मेघा रायकर, यवत व ज्ञानेश्वरी गायकवाड, सौरभ गायकवाड
बोरखळ सातारा यांना सत्यशोधक विवाह व अमर बोराटे सामाजिक कार्यकर्ते ,अंथुरणे यांना आपले कुटुंबात सत्यशोधक दशक्रिया विधी या कार्याबद्दल महात्मा फुले सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

फुले दाम्पत्याचे विचारांचा प्रसार व प्रचार कार्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल राजश्री दिनकर आगम अध्यक्ष रागिणी फौंउंडेशन बारामती
दत्तात्रय माळी अध्यक्ष माळी सेवा संघ सोमनाथ पाटील, अध्यक्ष ध्यास प्रतिष्ठाण पुणे, महादेव क्षीरसागर संतकृपा परिवार लोणंद, हितेश नेवसे
अध्यक्ष सुर्यरत्न फौंडेशन नायगाव या युवकांना महात्मा फुले युवा गौरव पुरस्काराने सन्मानित केले.
महात्मा फुले यांच्या बांधकाम व कॉन्ट्रॅक्टर या अतुलनीय कार्याचे स्मरण म्हणून बांधकाम क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल नितीन होवाळ सद्गुरुकृपा डेव्हलपर्स खंडाळा व शंकरराव क्षीरसागर कॉन्ट्रॅक्टर लोणंद यांना महात्मा फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वयंसिद्धा स्वसंरक्षण कला वर्गात विशेष प्राविण्य मिळवलेल्या चैत्राली भोसले, गौरी ननावरे, अनुजा शेंडगे , प्रणाली यादव, सोमनाथ ननावरे यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जतु गार्डे यांनी केले कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी सुनील रासकर, राहुल जाधव, , किशोर ननावरे तसेच महात्मा फुले विचार अभियानचे संयोजक व ग्रामस्वराज्य सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी राहुल डेरे आनंदनाना गुळमकर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. संदीप ननावरे यांनी उपस्थित फुलेंप्रेमींचे आभार मानले.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!