● आजच्या मोठ मोठ्या लग्न कार्यात अमाप खर्च करणाऱ्या सुशिक्षितांच्या डोळ्यांत अंजन घालणारा सोहळा.
● या आदर्शवत विवाह सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार.
पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले प्रणित सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे पुरोगामी विचारांना कृतीची जोड देत होणाऱ्या या विवाह सोहळ्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
नेहा नाडे व महादेव खंडागळे यांचा हा सत्यशोधक विवाह सोहळा २६ नोव्हेंबर रोजी नवी सांगवीतील मल्हार गार्डन येथे संपन्न होणार आहे.
आपण वधु वरास शुभाशिर्वाद देण्यासाठी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप ( चिंचवड विधानसभा ) राजेश पाटील ( आयुक्त , पिं.चि.म.न.पा ) कृष्णप्रकाश ( पोलिस आयुक्त , पिंपरी चिंचवड ), माई ढोरे (महापौर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका) तसेच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या विवाह सोहळ्या साठी स्वागतोत्सुक निमंत्रक- संतोष कांबळे ( स्थायी सदस्य पि.चि.म.न.पा. , अध्यक्ष फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन ) व समस्त नाडे , खंडागळे , मोरे परिवार आहेत.
फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन , जुनी सांगवी , मैत्री पत्रकार ग्रुप सांगवी पिंपळे गुरव . यांनी विवाह सोहळ्याचे नियोजन केले आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले प्रणित सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा कसा असतो.
देशातील पहिला सत्यशोधक विवाह महात्मा फुलेंनी घडवुन आणला . पुरोहिताशिवाय लावलेला हा विवाह २५ डिसेंबर १८७३ रोजी पार पडला . वराचे नाव सीताराम जबाजी आल्हाट तर वधु राधा ही बजुबाई निंबणकरांची कन्या या विवाहाचा खर्च स्वत : सावित्रीमाईंनी केला .
आजही सत्यशोधक विवाह ही काळाची गरज आहे . अतिशय साधी , सरळ व सोपी विवाह पद्धत म.फुलेंनी १९ व्या शतकातच दाखवुन दिली. बहुजनांना ती आजही माहीती नाही . या सोहळ्यात गावातील म . फुले , महापुरूषांच्या पुतळयास अभिवादन केले जाते . अक्षदा धान्याऐवजी फुलांच्या पाकळ्या वापरल्या जातात . वधु – वरांच्या मध्ये अंतरपाट धरुन म . फुलेंनी लिहिलेल्या सुंदर मंगलाष्टकांचे गायन केले जाते . म . फुलेंनी लिहीलेली शपथ वर – वधुस दिली जाते . वर – वधुंनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाळा घातल्यानंतर त्यांच्या वस्त्राची महासत्यगाठ बांधली जाते . ना हुंडा , ना आर्थिक देवाणघेवाण अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न होतो.
कोरोना संकटातील आदर्श लग्न .. !
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या विवाहाच्या निमित्ताने कोरोना जागृती सोबतच समाज जागृतीचा सामाजिक संदेशही समाजास मिळेल . शिवाय या सत्यशोधक लग्न सोहळ्याच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात खर्चिक लग्नसोहळा टाळण्याचा एक आदर्शही निर्माण होऊ शकतो.
Comments are closed