पिंपरी , दि. ६ :-  दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेस सांगवी परिसर महेश मंडळ ( माहेश्वरी समाज ) यांच्या वतीने दोन कॉन्टँक्टलेस ओटोमँटिक हँण्डसँनिटायझर मशिन भेट देण्यात आल्या. सध्या कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे जरी शाळा बंद असल्या तरी शालेय क्रमिक पुस्तके पालकांकडे सुपुर्त केले जात आहे. तसेच माजी विद्यार्थ्यांचे दुबार दाखले, बोनाफाईड प्रमाणपत्रे यामुळे नागरिकांची येजा चालु आहे. शिक्षकेतर कर्मचारीही शाळेत कार्यरत असल्याने मंडळाच्या वतीने या दोन मशिन्स प्रशालेस भेट देण्यात आल्या.

(फोटो – दापोडी: सांगवी परिसर महेश मंडळ ( माहेश्वरी समाज ) यांच्या वतीने स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेस हँण्डसँनिटायझर मशिन भेट देण्यात आल्या त्यावेळी उपस्थित मान्यवर.)

मंडळाचे अध्यक्ष सतिश लोहिया आणि पदाधिकारी निलेश अटल, विवेक झंवर, पंकज टावरी व सतीश पवार यांच्या हस्ते या मशिन्स प्रशालेचे मुख्याध्यापक राम गोंटे, पर्यवेक्षक विश्वास जाधव व त्यांचे सहकारी शिक्षक मिलिंद संधान,  संजय झराड, राजु रघावंत, अनिल पाटील व इतर शिक्षक यांच्या कडे सोपवण्यात आल्या .

#

Comments are closed

error: Content is protected !!