पुणे, दि. 25 ( punetoday9news) :- राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सर्व उच्च व तंत्रशिक्षण संस्थांमधील शिक्षकांच्या सर्वसमावेशक प्रशिक्षणासाठी पुणे येथे महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेची (महाराष्ट्रा स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी -एमएसएफडीए) स्थापना केली आहे. या अकादमीमध्ये सहसंचालक तसेच अकादमीअंतर्गत विविध केंद्रांसाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी पात्र उमेदवारांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अकादमीमध्ये सहसंचालक तसेच केंद्र समन्वयकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. अकादमीच्या बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र (सेंटर फॉर मल्टी डिसीप्लिनरी करिक्युलम ॲण्ड पेडागॉजी) , नेतृत्व विकसन केंद्र (सेंटर फॉर लीडरशिप डेव्हलपमेंट), समावेश आणि विविधता केंद्र (सेंटर फॉर इन्क्लुजन ॲण्ड डायव्हरसिटी), नाविन्यता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र (सेंटर फॉर इन्होवेशन ॲण्ड कटींग एज टेक्नॉलॉजी), संसाधन केंद्र (सेंटर फॉर रिसोर्सेस) आणि सेंटर फॉर नेटवर्कींग या सहा केंद्रांसाठी केंद्र समन्वयकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
एमएसएफडीए बद्दलची माहिती, पदांचे तपशील, नियुक्तीसाठीची पात्रता, निकष आदी माहिती https://rusa.maharashtra.gov.in या संकेतस्थळारील तपशीलवार जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे, अशी माहिती राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानचे राज्य प्रकल्प संचालक तथा एमएसएफडीए चे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक यांनी दिली आहे.
Comments are closed