सांगवी,दि.२६ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस ठाणे येथे २६/११ आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांना पोलीस बांधवानी व नागरिकांनी मेणबत्ती लावून आणि पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली .
याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोनपे यांनी श्रद्धांजली पूर्वक भाषण केले. पोलीस उपनिरीक्षक मिनिनाथ बोरोडे यांनी त्यावेळी मुंबईत असताना त्यांच्या सोबत असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी अतिरेक्यांशी दिलेल्या कडव्या झुंजेची आठवण सांगितली . हा थरारक प्रसंग ऐकताना उपस्थित भावुक झाले .
यावेळी सांगवी गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनिल तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे, कविता रूपनर, पोलीस उपनिरीक्षक काळू गवारे, भरत गोसावी, मीनीनाथ बोरोडे, गिरीश राऊत, शांतता कमिटी समिती सदस्य संजय मराठे, विजय गायकवाड, राजू आवळेकर आदी मान्यवर व पोलीस कर्मचारी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
Comments are closed