“माझे संविधान,माझा अभिमान “

औंध ,दि.२६ ( punetoday9news) :- जनता शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यामंदिर,औंध प्रशालेत भारतीय संविधान दिन  साजरा करण्यात आला.

“माझे संविधान,माझा अभिमान ” या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रशालेचे प्राचार्य राजू दीक्षित, पर्यवेक्षिका भारती पवार ,कार्याध्यक्ष कांबळे वाय.जी. तसेच जेष्ठ शिक्षिका शेळके एच.एस,चव्हाण एन,एल.  पतसंस्था संचालक अशोक गोसावी यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रर्यवेक्षिका भारती पवार यांनी केले जेष्ठ शिक्षिका शेळके एच.एस. सुधाकर कांबळे, बिपीन बनकर यांनी मनोगत व्यक्त केले.


जनता शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष कांबळे वाय.जी.यांनी प्रशालेस “भारतीय संविधानाच्या” तीन प्रती प्रशालेस सप्रेम भेट दिल्या. कांचन घुले यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

 

Comments are closed

error: Content is protected !!