कोरोना संकटातील आदर्श लग्न .. !
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या विवाहाच्या निमित्ताने कोरोना जागृती सोबतच समाज जागृतीचा सामाजिक संदेशही समाजास देण्यात आला . या सत्यशोधक लग्न सोहळ्याच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात खर्चिक लग्नसोहळा टाळण्याचा एक आदर्शही समाजासमोर प्रस्थापित केला आहे .
सांगवी,दि.२६ (punetoday9news ):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात नेहा नाडे व महादेव खंडागळे यांचा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले प्रणित सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा नवी सांगवीतील मल्हार गार्डन पार पडला . त्यामुळे पुरोगामी विचारांना कृतीची जोड या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांनी अनुभवली .
यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहून या अनोख्या सोहळ्यात नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या . यामध्ये स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप ( चिंचवड विधानसभा ) माई ढोरे (महापौर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका) नगरसेवक संतोष कांबळे , हर्षल ढोरे, शारदा सोनावणे , जवाहर ढोरे तसेच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
या विवाह सोहळ्याची जबाबदारी नगरसेवक संतोष कांबळे ( स्थायी सदस्य पि.चि.म.न.पा. , अध्यक्ष फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन ) यांनी पार पाडली. या विवाहाच्या वेळी उपस्थितांना नवविचारांचा वसा जोपासण्यासाठी पुस्तक भेट देण्यात आले.
देशातील पहिला सत्यशोधक विवाह महात्मा फुलेंनी घडवुन आणला . पुरोहिताशिवाय लावलेला हा विवाह २५ डिसेंबर १८७३ रोजी पार पडला . वराचे नाव सीताराम जबाजी आल्हाट तर वधु राधा ही बजुबाई निंबणकरांची कन्या या विवाहाचा खर्च स्वत : सावित्रीमाईंनी केला .
आजही सत्यशोधक विवाह ही काळाची गरज आहे . अतिशय साधी , सरळ व सोपी विवाह पद्धत म.फुलेंनी १९ व्या शतकातच दाखवुन दिली. बहुजनांना ती आजही माहीती नाही . या सोहळ्यात गावातील म . फुले , महापुरूषांच्या पुतळयास अभिवादन केले जाते . अक्षदा धान्याऐवजी फुलांच्या पाकळ्या वापरल्या जातात . वधु – वरांच्या मध्ये अंतरपाट धरुन म . फुलेंनी लिहिलेल्या सुंदर मंगलाष्टकांचे गायन केले जाते . म . फुलेंनी लिहीलेली शपथ वर – वधुस दिली जाते . वर – वधुंनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाळा घातल्यानंतर त्यांच्या वस्त्राची महासत्यगाठ बांधली जाते . ना हुंडा , ना आर्थिक देवाणघेवाण अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न होतो.
Comments are closed