पिंपरी,दि. २७( punetoday9news):-
पिंपरी-चिंचवड शहरातील मराठवाडावासीय मित्र परिवाराने स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. सुमधूर गीतांच्या मैफिलीचा आनंद लुटत स्वादिष्ट फराळाचा आस्वाद घेत सर्वजण गप्पांमध्ये रमले होते. थेरगाव येथे मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी फराळ व वार्षिक स्नेहमेळाव्याला पिंपरी चिंचवडमधील दोन हजाराहून अधिक मराठवाडावासीय मित्र परिवाराची उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे म्हणून वाकड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की प्रत्येक माणसाने एकमेकांशी सौजन्याने वागून संघटनेच्या माध्यमातून अडीअडचणीच्या वेळी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. सामाजिक कार्यकर्ते अरूण पवार व मराठवाडा मित्र परिवार सातत्याने हे कार्य करत आहेत.
मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार यांनी गेल्या १५ वर्षापासून केलेल्या कार्याचा आढावा घेताना सांगितले, की पिंपरी-चिंचवडमधील सर्व मराठवाडा वासियांना हक्काचे व्यासपीठ म्हणून शहरात मराठवाडा भवन निर्माण होणे गरजेचे आहे. आपापसात मदत करण्यासाठी, तसेच आपल्या माणसांना ताकद देण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. धनाजी येळकर यांनी अतिक्रमण घरांच्या प्रश्नात साथ देण्याचे आवाहन केले.
यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, मराठवाडा मित्र परिवाराचे श्रीमंत जगताप, प्रकाश इंगोले, ह.भ.प. गजानन महाराज वाव्हळ, सामाजिक कार्यकर्ते उमेश गुंड, सामजिक कार्यकर्ते शशिकांत दुधारे, सामाजिक कार्यकर्ते संदीप राठोड, संभाजी ब्रिगेड पुणे उप जिल्हाअध्यक्ष सतीशजी काळे मारुती बानेवार.रमेश परळीकर . संजविनी पुराणिक .गणेश भोसले .किशोर अटरगेकर . सी. ए. एकनाथ मुंडे. डॉ. नारायण जायभाये प्राध्यापक शाहुराज कधेरे .हनुमंत घुगे छावा मराठा युवा महासंघाचे महासचिव मनोज मोरे,डॉ रामेश्वर मुंडे संतोष जायभाये .उद्योजक राधाकृष्ण मिटे, अभियंता सावंत आदींनी मनोगत व्यक्त केले.
स्नेहमेळाव्याला समाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे, ह.भ.प. बाबुराव तांदळे महाराज, समाजसेवक अमोल नागरगोजे, गणेश पाडूळे ,भिमाजी भोसले उद्योजक पदामाकर मोरे .आदिवासी सह्याद्री मंडळाचे सदस्य विष्णु शेळके, संतोष पाटील उदोजक संतोष भोंगाडे गोरख सानप , संजय किरतने . विकास आघाव. ॲड अतुल पाटील हनुमंत घुगे. नामदेव पवार .सुनील नाईकनवरे हरी काळे सामाजिक कार्यकर्ते सुभाष दराडे, उद्योजक बाळासाहेब काकडे, सुखदेव वानखेडे, संतोष जाधव, उत्तम घुगे, जि. प. सदस्य दत्ताजी शिंदे, समाजसेवक गोरख मोरे, माधव मनोरे, अभिमन्यू गाडेकर, मराठी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष मारुती आवरगंड, मराठवाडा जनविकास संघाचे सचिव सूर्यकांत कुरुलकर, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, डॉ ,अतुल होळकर , शिवाजी डोंगरे लातूरकर ,किशोर पाटील .जीवन बोराडे .नाना साळुंके .श्रीपती पाटील सर .सतीशजी काळे . संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नरेंद्र माने, वामन भरगंडे, दत्तात्रय धोंडगे, अण्णा जोगदंड, रविकांत पाटील, अनिसभाई पठाण, विठ्ठल कदम, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरीष नखाते, पी.जी.नाना तांबारे आदी उपस्थित होते. तसेच मराठवाड्याच्या विविध भागातून आलेले व पिंपरी चिंचवड येथे स्थायिक नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रशांत फड यांनी, सूत्रसंचालन शिव व्याख्याते प्रा. संजय टाक यांनी केले. तर उद्योजक उमेश गुंड यांनी आभार मानले.
Advt:-
Comments are closed