शिरूर, दि. २७( punetoday9news):- शिरूर येथील सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी मतदार नोंदणी शिबीराचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. बाहेती, प्रांत संतोष देशमुख, तहसीलदार लैला शेख, शशिकांत भोसले, कुरंदळे, पाटील व शुभांगी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. बाहेती हे होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. बाहेती म्हणाले की, मतदार हा राजा आहे व मतदान करणे हा आपला हक्क आहे. महाविद्यालयाने या शिबिराचे आयोजन करून या कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. या प्रसंगी कुरंदळे यांनी विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावणे हे किती मोलाचे दान आहे असे स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे, हर्षवर्धन थिटे, समन्वयक शिवाजी पडवळ यांनी शुभेच्छा दिल्या. या शिबिरात महाविद्यालयाच्या १२० विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यात आली.
सुरुवातीला प्राचार्यांच्या हस्ते मान्यवरांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. निशिकांत शिंदे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन कोठावदे यांनी मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनोज तारे यांनी केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन कोठावदे, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. निशिकांत शिंदे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक रोहित कदम, प्रसाद जगताप, विशाल चव्हाण, मोनिका तांदळे, श्रुती कलदाते, व इत्यादी स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.


Comments are closed

error: Content is protected !!