पिंपरी, दि. २७( punetoday9news):-
देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी सायंकाळी खडकी रेंजहिल्स अँम्युनेशन फॅक्टरी वसाहत येथे छावा मराठा संघटनेच्या वतीने 26/11 हल्ल्यातील शहिदांना मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
        खडकी येथे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात छावा मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह चिमुकलेही सहभागी झाले होते. मेणबत्त्या प्रज्वलित करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
         यावेळी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव, सुभाष धर्मलिंगम,कमलेश पेरुमल, अनिल जाधव, अन्वर शेख, भास्कर वाकडे, संतोष कांबळे, पोपट यादव, शुभम महाले, बाबू लोहिरे, गणेश शिंदे, श्रीपाल कुशवाह, पवार काका, शुभम गवळी, सोमेश नेटके, गोटू भालेराव, लालाजी भाय आदींनी मेणबत्त्या प्रज्वलित करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
           यावेळी रामभाऊ जाधव म्हणाले, की 26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे प्रवेश करत मुंबईला टार्गेट केले होते. या हल्ल्यामध्ये 34 विदेशी नागरिकांसह 166 जणांना आपला प्राण गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले. प्राणाची पर्वा न करता लढलेल्या पोलीस जवानांनी 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालत, अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडले. यात 18 पोलीस जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याला शुक्रवारी तेरा वर्षे पूर्ण झाली. मुंबईवर झालेल्या या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी व नागरिकांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. त्यांचा त्याग व बलिदानाची जाणिव ठेवूयात. हा देश भयमुक्त करण्यासाठी काम करुया.


Comments are closed

error: Content is protected !!