विविध पदांसाठी निवड म्हणून मिळणाऱ्या मेसेजची खात्री करण्याची गरज.
पिंपरी चिंचवड शहरात विविध पद, पुरस्कार वाटणारे मोठे रॅकेट कार्यरत ?
पुरस्कारांसाठी उकळले जातात हजारो रूपये.
यासाठी विविध संस्था, भारत सरकारचे लोगो वापरले जातात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी फसवणूक.
पिंपरी, दि. २८ ( punetoday9news):- पिंपरी – चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरातील डेंटिस्ट असलेल्या डॉक्टरला मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने संचालकपदी निवडण्याच्या बहाण्याने तब्बल १ कोटी रुपयांचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे.
या प्रकरणी डॉ . आदित्य दगडू पतकराव ( वय ३६ ) यांनी विकास शिंदे , राजाराम शिर्के ( कक्ष अधिकारी मंत्रालय , मुंबई ) , श्रेया चौहान , अजित दुबे अशा ४ आरोपींविरोधात सांगवी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे .
डॉ . आदित्य पतकराव यांना सूक्ष्म , लघु , मध्यम मंत्रालयामध्ये महाराष्ट्र राज्याच्या संचालकपदी निवडण्याचे आमिष दाखवण्यात आले आणि त्यातूनच फसवणूक केली . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , डॉ . आदित्य दगडू पतकरराव हे डेंटिस्ट असून सांगवी परिसरात रुग्णालय आहे . डॉ . आदित्य यांची काही वर्षांपूर्वी त्यांच्या बहिणीमार्फत आरोपी राजाराम शिर्के याच्याशी ओळख झाली होती . त्यानंतर शिर्के यांनी डॉक्टरांशी फेसबुक व इतर सोशल मीडियावर ओळख वाढवली . आरोपी शिर्के आणि डॉ . आदित्य यांच्यात अनेकदा फोनवरून संभाषणही झाले . याशिवाय प्रत्यक्षात देखील अनेक वेळा भेट झाली .
आरोपींनी या प्रकरणात भारत सरकारच्या राजमुद्रेचा गैरवापर केला असल्याची बाब समोर येत आहे. यात राजाराम शिर्के यांनी डॉ . पतकराव यांना सूक्ष्म , लघु , मध्यम मंत्रालयामध्ये महाराष्ट्र राज्याचं संचालकपद तुम्हाला देऊ असे आमिष दाखवले . मात्र , त्यासाठी पैसे द्यावे लागतील अशी अट घातली . डॉ . आदित्य यांनी होकार देत त्यांना तब्बल १ कोटी ६ लाख रुपये दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे .
अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी दिली आहे . या घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत .
Comments are closed