सांगवी,दि. २८( punetoday9news):- सांगवी परिसर महेश मंडळातर्फे यंदा दीपावली एवं स्नेहमिलन कार्यक्रम व अन्नकोट महोत्सव चे आयोजन पिंपळे गुरव येथील श्रीकृष्ण मंदिरात करण्यात आले .
या दरम्यान “उमंग २०२१” या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते , सुंदरलेखन , चित्रकला,ज्ञानगंगा (सामान्य ज्ञानावर) , बुद्धिबळ , मेहेंदी , सलाड डेकोरेशन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीकिसन भन्साळी यांच्या हस्ते करण्यात आले . या वेळी नगरसेविका शारदा सोनावणे, गोविंद मुंदडा, शेखर सारडा मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मनोज अटल यांनी केले .
या वेळी प्रमुख पाहुणे श्रीकिसन भन्साळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले कि जर आजच्या काळात मुलींच्या संसारात मुलींच्या माता पित्यांनी हस्तक्षेप टाळले तर अनेक मुलीचे संसार सुखी होतील.
अश्या ह्या विविध स्पर्धामध्ये २५० हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला . या वेळी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुकुंद तापडिया, निलेश अटल, सुनील लोहिया, सत्यनारायण बांगड, विवेक झंवर ,पंकज पंपालिया, दीपेश मालाणी , पद्मा लोहिया आदींनी विशेष सहकार्य केले .
Comments are closed