पुणे, दि. ३०( punetoday9news):- नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा ( NMCG ) व नॅशनल इनस्टीयूट ऑफ अर्बन अफेयर्स , ( NIUA ) , नवी दिल्ली यांचे द्वारे देशस्तरावर ” रिव्हर्स सिटीज अलायन्स तयार करण्यात आला आहे .
“ नद्यांबद्दल नव्याने विचार करणे आवश्यक आहे शहरांनी नदी पुनरुज्जीवनाची जबाबदारी घेतली पाहिजे ” या विचारसरणीला अनुसरून दिनांक 25-11-2021 रोजी , नवी दिल्ली येथे RCA या कार्यक्रमाचे उद्घाटन गजेंद्र सिंग शेखावत , मंत्री , जलशक्ती मंत्रालय , भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात आले . ” राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन ” केवळ गंगा नदी पुरताच मर्यादित न राहता , देशातील इतर नद्यांचे सुद्धा पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे , यासाठी भारतातील प्रमुख नद्या असलेले एकूण तीस शहरांचा “ आर . सी . ए . ” मध्ये समावेश झाला आहे .
भारतातील आयोध्या , औरंगाबाद , भागलपुर , बागूसराय , बिजनोर , बेहरंपुर , भुवनेश्वर , चेन्नई , देहरादून , ऋषिकेश , हरिद्वार , श्रीनगर , मुंगेर , हूगली – चीन सुराह , पटना , हावडा , महेशताला , जांगीपुर , राजमहल , फरक्काबाद , साहीबगंज , कानपूर , मथुरा – वृंदावन , प्रयागराज , मिर्झापूर , पुणे , वाराणसी , विजयवाडा आणि उदयपूर ही शहरे आहेत .
शहर व नदी एकमेकांशी जुळळे जावे व प्रत्येक शहराला एकमेकांपासून नवीन बाबी शिकता यावे , नदीसाठी राष्ट्रीय धोरणात्मक बाबी स्थानिक स्तरावर कशा अवलंबता येतील जेणेकरून नदीकाठ विकसन व संरक्षण , नदीची परिसंस्था समृद्ध करणे , तसेच ऐतिहासिक वारसा जपणे , पाण्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करून शाश्वत पाणी वापर करणे , या सर्व बाबींबद्दल शहरांना देवाण – घेवाण करता येईल , यासाठी RCA हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे . दिनांक 25-11-2021 रोजी झालेल्या कार्यशाळेमध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे अतिरिक्त महापालिका आयुक्त ( ई ) , डॉ . कुणाल खेमनार उपस्थित होते . कार्यशाळेमध्ये शहरातील नद्यांना भेडसावणारे प्रश्न , ज्यामध्ये सांडपाणी व्यवस्थापन , नदीकिनारी अतिक्रमण , नदीकाठावर राडारोडा व कचरा टाकणे , नदीकाठी पूर रेषे मध्ये असलेली जागा मालकी , नदीशी संलग्न असलेले विविध शासकीय विभाग , जसे की पाटबंधारे विभाग , महानगरपालिका , कॅन्टोन्मेंट बोर्ड , महसूल विभाग , इत्यादी सर्वांनी त्यांच्या कार्यक्षेत्राच्या माध्यमातून नदी पुरुज्जीवन साठी प्रयत्न करणे आवश्यक आहे . नदीकाठ जवळ असलेले रहिवासी भागांचे पूरापासून रक्षण करणेसाठी नदीची पूर वहन क्षमता वाढविणे , पूररेषा नियंत्रण करणे , हरीत पट्टा निर्माण करणे , यासाठी एकूण नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते , या विषयांवर चर्चा झाली . पुणे शहराचे मुळा – मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी केलेला अहवाल , पायलट स्तरावर संगम ते येरवडा पर्यन्तचे टेंडर , नदी स्वच्छता मोहीम जसे की “ प्लॉगेथॉन ” सारख्या उपक्रमातील पुणे शहरातील 55 हजार नागरिकांच्या मदतीने 57 टन प्लास्टिक गोळा केले , गणेश विसर्जन हौद बरोबरच फिरते विसर्जन हौद , अमोनियम बायकार्बोनेटचा घरच्या घरी मूर्ती विसर्जनासाठी वापर इत्यादी ची माहिती देण्यात आली . RCA व्यासपीठा तर्फे नदीच्या शाश्वत विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक पाठबळ देणे , शहरांसाठी मार्गदर्शक सूचना व आराखडा करणे , नदी काठ पर्यंत नागरिकांना सहजरित्या पोहोचता यावे व नदीकाठ नागरिकाभिमूख करणे , नदीबाबत आधुनिक तांत्रिक मदत , नदी स्वच्छ करण्यासाठी नवनवीन मशिनरीचा वापर , त्यांचे दर इत्यादीबाबत शहरांना मदत करणे , आंतरराष्ट्रीय शहरांनी नदी पुनरुज्जीवन केलेल्या चांगल्या प्रकल्पांची माहिती शहरांना देणे , जनजागृती चे कार्यक्रम करणे , नदी सुधारणा बद्दल वेबसाईट ची निर्मिती करणे व त्यामध्ये वेळोवेळी नवीन बाबी समाविष्ट करणे , केवळ नदीच नव्हे तर संपूर्ण वॉटरशेड पाणलोट क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे , या उद्देशाने पुढील वाटचाल केली जाणार आहे . ”
Comments are closed