पुणे, दि. १( punetoday9news):- महाराष्ट्र राज्यात दक्षिण अफ्रिकेसह इतर जोखमीच्या देशातून आलेले सहा प्रवासी करोनाबाधित आढळलेल आहेत . कल्याण डोंबिवली , मुंबई महानगरपालिका , मीरा भाईंदर मनपा आणि पुणे या भागात अफ्रिका आणि इतर जोखीमच्या देशातून आलेला प्रत्येकी एक प्रवासी करोनाबाधित आढळला असून , पिंपरी – चिंचवड मनपा हद्दीत नायजेरियातून आलेले दोन जण करोनाबाधित आढळले आहेत .

या प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे . युरोप आणि ज्या देशांमध्ये ओमायक्रॉन आढळून आला आहे , असे ११ देशांमधून जे प्रवासी भारतात येत आहेत त्या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत असून जे प्रवासी यामध्ये बाधित आढळतील त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत . जे प्रवासी बाधित आढळणार नाहीत त्यांचेही विलगीकरण केले जाणार आहे . सात दिवसानंतर पुन्हा आरटीपीसआर चाचणी केली.

कल्याण डोंबिवली , मुंबई महानगरपालिका , मीरा भाईंदर मनपा आणि पुणे येथे आढळलेल्या बाधित प्रवाशांच्या संपर्कातील व्यक्तिंचा शोध घेण्यात येत आहे . याचबरोबर , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नायजेरियातून आलेले दोन प्रवासी कोविडबाधित आले असून त्यांचेही नमुने एन आय व्ही पुणे येथे जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत . हे सर्व प्रवासी करोनाबाधित असले तरी लक्षणेविरहित अथवा सौम्य लक्षणे असणारे आहेत.

इतर देशातील प्रवाशांच्याही चाचण्या जे प्रवासी ओमायक्रॉन सापडलेल्या देशांव्यतिरिक्त इतर देशांतून येणार आहेत , त्यांच्यातील देखील पाच टक्के प्रवाशांची तपासणी करुन त्यातील बाधित नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने आदेश दिले आहेत .

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!