पिंपरी, दि .३( punetoday9news):- पिंपरी चिंचवड व पुणे शहरात मागील दोन दिवसांपासून धुकं , थंडी व पाऊस असे काहीसे विचित्र वातावरण झालेले आहे . हवामान विभागाकडून शहरात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी8:30 ते रात्री 11:30 ० पर्यंत झालेल्या पावसाने नवीन रेकॉर्ड निर्माण केला आहे.
पाषाण हवामान विभागाने नोंद केल्यानुसार शहरात 76.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतकचं नव्हे तर 1996 पासून सर्वात ‘ओला’ डिसेंबर म्हणून कालच्या दिवसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आतापर्यंत डिसेंबर महिन्यात सर्वाधिक 51.3 मिलीमीटर पाऊस डिसेंबर 2014 मध्ये पडला होता. शहरातील तापमानातही मोठ्या प्रमाणात घट झाली होती. पाऊस, धुकं यामुळे शहरात 19.4 अंश सेल्सिअसवर तापमान आले होते. रात्रीही पाऊस सुरु राहिल्याने वातावरणात मोठ्याप्रमाणात गारवा निर्माण झाला होता.
मागील दोन दिवसांपासून शहरात धुकं , थंडी व पाऊस असे काहीसे विचित्र वातावरण झालेले आहे . हवामान विभागाकडून शहरात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी स. 8:30 ते रात्री 11:30 पर्यंत झालेल्या पावसाने नवीन रेकॉर्ड निर्माण केला आहे. पाषाण हवामान विभागाने नोंद केल्यानुसार शहरात 76.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतकचं नव्हे तर 1996 पासून सर्वात ‘ओला’ डिसेंबर म्हणून कालच्या दिवसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आतापर्यंत डिसेंबर महिन्यात सर्वाधिक 51.3 मिलीमीटर पाऊस डिसेंबर 2014 मध्ये पडला होता. शहरातील तापमानातही मोठ्या प्रमाणात घट झाली होती. पाऊस, धुकं यामुळे शहरात 19.4 अंश सेल्सिअसवर तापमान आले होते. रात्रीही पाऊस सुरु राहिल्याने वातावरणात मोठ्याप्रमाणात गारवा निर्माण झाला होता.
पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार.
येत्या 3 आणि 4 डिसेंबरला पावसाची तीव्रता कमी होईल. शहरात हलका ते हलका पाऊस पडेल आणि पुढील तीन दिवस अंशतः ढगाळ वातावरण असेल. या परिस्थितीमुळे, दिवसाचे तापमान सामान्य श्रेणीपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे. सहसा, दिवसाचे तापमान 28-29 डिग्री सेल्सिअस दरम्यान असते, परंतु आता ते 4-5 डिग्री सेल्सिअसने कमी होईल, अशी माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. डिसेंबरमध्ये सहसा पाऊस पडत नाही. हे बदल हवामान प्रणालीवर अवलंबून असते जे वातावरणातील विविध कारणांमुळे बदलत राहते. यापूर्वीही डिसेंबरमध्ये पावसाची नोंद आहे.
धुकं ढगाळ वातावरण , पाऊस यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या काढलेल्या पिकांची योग्य प्रकारे साठवणूक करावी, असे आवाहनही हवामान विभागाकडून देण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसामुळं जनजीवन मोठ्याप्रमाणात विस्कळीत झाले आहे. शेतीचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या 24 तासात पुण्यात पडलेला पावासामुळे जिल्ह्यातील मावळ भागात काढणीला आलेलं भात, ऊस या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. पावसामुळं काढणीला आलेली पिके भुईसपाट झाली आहे, तर अनेक ठिकाणी पिकांवर रोग पडला आहे. पावसामुळं धुक्यामध्येही मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे.
Comments are closed