पिंपरी ,दि.२ ( punetoday9news ):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशन लाच प्रकरणातून पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यापूर्वीही लाच प्रकरणात एसीबी ने उशिरा रात्री एका पोलिसावर कारवाई केली होती .  आताही आलेल्या  तक्रार अर्जावरून बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी महिला  पोलीस – उपनिरीक्षक हेमा सिद्धराम सोळुंके यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली असल्याचा प्रकार उघडकीस आला तसेच यात तडजोड करून 70 हजार रुपये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाद्वारे स्वीकारले  असून या प्रकरणात एसीबी ने धडक कारवाई करत सापळा रचून अटक केली आहे. तर सोबत असलेला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्ण देसाई एसीबीच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन पळून गेला असल्याची माहिती समोर आली आहे.  

ही घटना सांगवी पोलीस ठाण्यात घडली . याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली आहे . एसीबीने दिलेल्या माहितीनुसार , तक्रारदार व्यक्तीच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात अर्ज आला आहे . त्या अर्जाची चौकशी उपनिरीक्षक सोळुंके यांच्याकडे आहे . अर्जावरून बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी उपनिरीक्षक हेमा सोळुंके यांनी तक्रारदारकडे एक लाख रुपये लाच मागितली . त्यानंतर तडजोड करून 70 हजार रुपये देण्याचे ठरले . याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली . एसीबीने 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी पडताळणी केली आणि 2 डिसेंबर रोजी सापळा लावला . सोळुंके यांनी सहायक उपनिरीक्षक देसाई यांना लाच घेण्यास पाठवले . लाच घेतल्यानंतर एसीबीचे अधिकारी देसाई यांनी पकडण्यासाठी गेले असता देसाई एसीबीच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन त्याच्या बेदकारपणे दुचाकी चालवून पळून गेला . एसीबीने उपनिरीक्षक सोळुंके यांना ताब्यात घेतले आहे .

पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक , पोलीस निरीक्षक भारत साळुंखे , सहायक पोलीस फौजदार शेख , पोलीस कर्मचारी नवनाथ वाळके , वैभव गिरीगोसावी , पूजा पागिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली .

 

 

Comments are closed

error: Content is protected !!