गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या रेनेसान्स – दी अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्रा या पुस्तकातील काही भागावर आक्षेप असल्याची भूमिका संभाजी ब्रिगेडकडून घेण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आल्याचं संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आलं आहे

नाशिक,दि.५ (PUNETODAY9NEWS ):-  नाशिकमध्ये लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरांवर वादग्रस्त लेखांमुळे शाईफेक झाल्यानंतर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.  काही नेत्यांनी याचे समर्थन केलं आहे तर काही नेत्यांनी शाईफेकीचा प्रकार अयोग्य असल्याचे म्हटले आहे.

आपल्या लिखानामुळे वादात येण्याची गिरीश कुबेरांची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा लिहलेल्या लेखांमुळे गिरीश कुबेर वादात सापडले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल  लिहल्यानंतर अनेक मराठा संघटनांनी गिरीश कुबेरांच्या लिखानाचा निषेध नोंदवला होता. भाजपनेही हे लिखान खोडसाळपणाचे असल्याची टीका केली होती. त्यानंतर आज नाशिकच्या साहित्य संमेलनात गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याने हा वाद पुन्दा एकदा पेटला आहे. राजकीय गोटतूनही दोन्ही बाजून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

या प्रकाराचा शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “आम्ही या सगळ्या घटनेचा निषेध करतो. गिरीश कुबेर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, लोकसत्तासारख्या दैनिकाचे संपादक आहेत. त्यांनी जे काही लिखाण केलं असेल किंवा करत आहेत त्यावर मतभेद असू शकतात. पण मुळात त्यांनी काय लिहिलंय, हे किती लोकांनी वाचलंय? न वाचता अशा पद्धतीने मराठी साहित्य संमेलन सुरू असताना त्यांच्यावर अशा प्रकारे शाईफेक करणं हे कुणालाही मान्य होणार नाही. त्यांनी जे काही लिहिलं आहे, त्यासंदर्भात काही लोकांनी तक्रारी केल्या आहेत. त्याबाबत खरं-खोटं होईलच. पण साहित्य संमेलन हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सगळ्यात मोठं व्यासपीठ असतं. तिथे एका संघटनेचे काही लोक येतात आणि त्यांच्यावर शाई फेकतात, धक्काबुक्की करतात. वीर सावरकरांच्या भूमीत, कुसुमाग्रजांच्या भूमीत असं करून संभाजी महाराजांच्या प्रतिमेला देखील त्यांनी डागाळलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.


Comments are closed

error: Content is protected !!